Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स तेलंगणा राज्य निर्मिती दिन

तेलंगणा राज्य निर्मिती दिन

Related Story

- Advertisement -

तेलंगणा भारताचे २९ वे राज्य आहे. 2 जून इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती. तेलंगणा भौगोलिकदृष्ठ्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोर्‍यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१- इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स.१५२०-इ.स.१६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स.१७२४-इ.स.१९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर तेलगू ही प्रमुख भाषा आहे.

तेलंगणा हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षे तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता. 9 डिसेंबर २००९ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगणा हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगणा राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक १५ व्या लोकसभेत १८ फेब्रुवारी २०१४ ला आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात २० फेब्रुवारी २०१४ ला संमत करण्यात आले आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.

- Advertisement -

तेलंगणा राज्यात पुढील जिल्हे आहेत : आदिलाबाद, करीमनगर, कामारेड्डी, कुमारम् भीम आसिफाबाद, खम्माम, जगतियाळ, जयशंकर भूपालपल्ली, जानगाव, जोगुलांबा गडवाल, नागरकुर्नूल, नारायणपेट, नालगोंडा, निजामाबाद, निर्मल, पेद्दापल्ली, भद्राद्रि कोठागुंडम, मंचरियाल, महबूबनगर, महबूबाबाद, मेडक जिल्हा|मेडक, मेडचल-मलकजगिरी, मुळुगू, यादाद्री भुवनगिरी रंगारेड्डी, राजन्ना सिरकिला, वनपर्थी, वरंगळ ग्रामीण, वरंगळ शहर, विकाराबाद, संगारेड्डी, सिद्दीपेट, सूर्यापेट, हैदराबाद. हैदराबाद शहर हे तेलंगणमधील सर्वात मोठे वाहतूक केंद्र आहे.

हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील एक प्रमुख विमानतळ असून येथून देशातील सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून हैदराबाद रेल्वे स्थानक, वरंगळ रेल्वे स्थानक इत्यादी मोठी स्थानके देशातील इतर भागांसोबत जोडली गेली आहेत. तेलंगणा एक्स्प्रेस, सिकंदराबाद राजधानी एक्स्प्रेस इत्यादी जलद गाड्या हैदराबादला दिल्लीसोबत जोडतात.

- Advertisement -

तेलुगू भाषिकांचे राज्य असलेल्या आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आले. त्यानंतर 14 जून 2014 मध्ये तेलंगण राज्य अस्त्वित्वात आले. नव्या राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर हैदराबाद राजधानीसह तब्बल दहा जिल्हे अस्तित्त्वात आले. या राज्यात तेलंगण राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांचे नवे सरकार सत्तेवर आले. केसीआर यांनी गेल्या दोन वर्षात राज्यात सरकार चालविताना सिंचनाच्या सोयी, पायाभूत सुविधा यावर भर देताना प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याला भेट देण्यावर अधिक भर दिला. विकासाची गती वाढविण्यासाठी आणि जिल्हा प्रशासन प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी लहान जिल्ह्यांच्या निर्मितीचा के. चंद्रशेखर राव यांनी निर्णय घेतला.

- Advertisement -