घरफिचर्सचित्रपटाने दाखवली ही बदलती मुंबई

चित्रपटाने दाखवली ही बदलती मुंबई

Subscribe

मुंबई म्हणजे स्वप्ननगरी..हे वाक्य आपण अनेकदा वेगवेगळ्या लोकांच्या तोंडी, वेगवेगळ्या संदर्भात ऐकलं आहे. आता टिपीकल वाटणारं वाक्य पूर्वी अनेकांनी सत्यात उतरवलं. ३ मे १९९३ ला चित्रपटाचा प्रवास याच मुंबईत सुरू झाला. दादा साहेब फाळके यांनी आपल्या पहिला मुकपट ’राजा हरिश्चंद्र’ पहिला शो मुंबईत दाखवला आणि मुंबईतून चित्रपटसृष्टीचा प्रवास सुरू झाला. चित्रपटाने लाखो प्रेक्षकांना अक्षरश: संमोहित केले. चित्रपटाने त्याचे सामर्थ्य दाखवून दिले. चित्रपटाने प्रेक्षकांना झपाटून टाकले आणि चित्रपट निर्मीतीसाठी, चित्रपटात कामं करण्यासाठी कलाकारांनी मुंबई गाठली आणि मुंबईची खर्‍या आर्थीने स्वप्ननगरी झाली.

बॉलिवूड आणि मुंबईचे फार जुने नाते आहे. मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. अमिताभ बच्चन यांनी डॉन मध्ये ई है बम्बई नगरीया तू देख बबुआ म्हटलं. आणि लोक मुंबईच्या दिशेने आले.

या स्वप्ननगरीत लाखो लोकांना रोजगार मिळवून देण्याचे सामर्थ आहे. चित्रपट उद्योगाच्या व्याप्ती हळूहळू वाढत गेली. पाठोपाठ अत्याधुनिकता आली. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान गरजेप्रमाणे घेऊन कल्पक चित्रपटांची निर्मीती या मुंबईत होऊ लागली. मुंबईत २६ सप्टेंबर १९७७ला चित्रनगरीची स्थापना झाली. २००१ मध्ये चित्रपट उद्योगाचे संस्थापक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण ” दादासाहेब फाळके चित्रनगरी ” असे करण्यात आले.

- Advertisement -

हळूहळू मुंबईत चित्रपटांची आणि त्यामागून येणार्‍या कलाकारांच्या संख्येत वाढ झाली. ओघाने मुंबईतील स्टुडिओची संख्या वाढली. एकामागून एक येणार्‍या मराठी आणि हिंदी चित्रपटाने या स्वप्ननगरीचे चित्रच पालटवले. मुंबई ही चित्रपटांसाठी केंद्रबिंदू ठरली. नंतर हळूहळू ही कला इतर राज्यात पसरली. आधी कामासाठी मुंबईत येणारे कलाकार मुंबईत स्थायिक झाले. चित्रपटांच्या संख्येतही वाढ झाली. आता महिन्याकाठी एक चित्रपट प्रदर्शित होऊ लागला. चित्रपटांप्रमाणेच मालिका ही नवीन संकल्पना उदयाला आली. चित्रपटातील कलाकार आणि प्रेक्षकांचा मोर्चा मालिकेकडे वळला. सुरूवातीला काही भागांची असणारी मालिका आता वर्षांनूवर्ष सुरू राहते. असंख्य लोकांचा मोर्चा या या निमित्ताने मुंबईत वळल्यामुळे मुंबई हे बेट आता शहर म्हणून विकसीत होऊ लागलं. सहाजिकच मुंबईकडे येणारा ओढा आणखी वाढला.

मुंबई पोषणकर्ता बनली

- Advertisement -

मुंबई औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला आली. केवळ चित्रपट आणि मालिकांचा विचार केला तरी असंख्य जोड उद्योग या निमित्ताने लोकांना मिळाले. सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरला तो कलाकारां इतकाच पडद्यामागे काम करणारी माणसं. त्याचप्रमाणे चित्रपटासाठी लागणारा सेट तयार करणे, मेकअप, कॅमेरा टीम, असे असंख्य जोड धंदे या निमित्ताने उदयास आले. लाखोंच्या हाताला रोजगार मिळाला. वेगवेगळ्या लोकांचा मुंबईत येण्यामुळे अनेक संस्कृती एकत्र आल्या. परिणामी त्याचा परिणाम चित्रपटांमध्येही दिसून आला.

मुंबई रंगली शूटींगमध्ये

मुंबईत हळूहळू दादा साहेब फाळके चित्रनगरी प्रमाणे अनेक स्टुडिओ उभारले. अगदी वडगाव बुद्रुकपासून वॉशिंगटनपर्यंत सेटच्या माध्यमातून मुंबईत उभं करणं शक्य झालं. त्यामुळेच ऐतिहासिक चित्रपटापासून विज्ञानाशी निगडीत विषयांपर्यंत चित्रपट तयार करणे सोपे झाले. राजेरजवाडे, एखादं गाव चित्रपटाटासाठी नव्याने वसू लागलं. याची अनेक उदाहरणे आपल्याला चित्रपटात दिसतील अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर शोले, लगान या चित्रपटासाठी एक संपूर्ण गाव वसवण्यात आलं होतं. पण आता जसंजस तंत्रज्ञान बदलत गेलं तसतस मुंबईत एखाद्या स्टुडिओत सेट उभारण्यापेक्षा निश्चित स्थळी (ऑन लोकेशन) जाऊन शूट करण्यावर भर देण्यात आला. १९९२ नंतरच्या ग्लोबलायझेशननंतर परदेशात गेलेला भारतीय चित्रपट आता चित्रपट निर्मीतीसाठी सर्रास परदेशात जाऊ लागला.

चित्रपटाची कथा मुंबईनुसार बदलली

मुंबई हे राजधानीने शहर असल्यामुळे असंख्य घटना या मुंबईत घडत असतात. एगदी संस्कृती जपण्यापासून ते गुन्हेगारीपर्यंत दररोज काहीतरी या मुंबईत घडत असतं आणि सगळ्याचा परिणाम चित्रपटाच्या कथेवरही झालेला दिसून येतो. सुरूवातीच्या काळात ऐतिहासिक, कौटुंबिक विषयांवर आधारीत असलेला चित्रपट मुंबईच्या या वातावरणात पार बदलून गेला. पुढे नव्वदीचा आणि २०००नंतरचा काळ आपल्या देशासाठी, समाजासाठी फार महत्त्वाचा ठरला. आर्थिक उदारीकरण झालं. त्यानं समाजातल्या सगळ्या स्तरांत प्रचंड उलथापालथ झाली. कौटुंबिक, आर्थिक, मानसिक पातळीवर आपल्या मूळ स्वभावात अनेक बदल व्हायला लागले. वेगवेगळ्या नातेसंबंधांत असंख्य पदर निर्माण व्हायला लागले. त्यामुळेच ऐतिहासिक, कौटुंबिक चित्रपटाप्रमाणेच सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, खेळ अशा असंख्य विषयांवर चित्रपटाची निर्मीती होऊ लागली. आता मुंबईतचं प्रतिनिधीत्व चित्रपटांमध्ये केलं जातं. त्यामुळेच जशी मुंबई बदलली तसा चित्रपट बदलत गेला. यात कथेप्रमाणेच चित्रपटात असणार्‍या लोकेशनचाही मोठा परिणाम चित्रपटांवर झाला. या बदलत्या मुंबईने बदलत्या देशाचं दर्शन चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवलं. त्यामुळे हल्ली पूर्वी सारखे चित्रपट होत नाहीत म्हणणार्‍यांनी मुंबई तरी पूर्वीची राहीली आहे का हे बघा.

बदलत्या मुंबईने स्टुडिओ गायब केले

एकेकाळी भरपूर स्टुडिओ असणार्‍या मुंबईच्या जमिनीची किंमत वाढली आणि स्टुडिओला उतरली कळा लागली. कालओघात भरपूर स्टुडिओ नामषेश झाले. याचे अलिगजचे योग्य उदाहरण म्हणजे आर के स्टुडिओ. स्टुडिओंचा पांढरा हत्ती कोण पोसणार असं म्हणत स्टुडिओमालकांच्या पुढच्या पिढीनं सरळ गाशा गुंडाळला. स्टुडिओंचं महत्त्व हळुहळू कमी होत गेलं. स्टुडिओ सांभाळणं हा तसा खर्चिक मामला. हल्ली स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण करण्याला प्राधान्य दिलं जातं. मुंबईबाहेर नवे स्टुडिओ तयार झाले आहेत. शिवाय, परदेशातलं चित्रीकरण वाढलंय. सिनेनिर्मात्यांच्या पुढच्या पिढीला स्टुडिओ चालवण्यात फारसा रस नाही. त्यामुळे हळुहळू स्टुडिओंना उतरती कळा लागली.

मुंबईला चित्रपट जमले पण पर्यटन नाही

सिनेसृष्टी आणि पर्यटन यांचं घनिष्ट नातं आहे. देशभरात हा सिनेमा ३०० कोटींचा आकडा पार करतो आहेच. पण जगभरात या सिनेमाला मिळणारी पसंती वाढते आहे. याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर होतोय. परदेशात शुटींगसाठी सहजतेने परवानग्या मिळू लागल्या, सवलतीही मिळाल्या परिणामी भारतीय चित्रपट परदेशात सूट होऊ लागला. चित्रपटात दिसणार्‍या लोकेशनमुळे प्रेक्षक त्या स्थळांना भेटी देऊ लागली. याचा परिणाम परदेशातील पर्यटन वाढीवर झाला. भारताबाहेर पर्यटनाच्या वृद्धीसाठी ज्या पद्धतीच्या सवलती दिल्या जातात यात मात्र भारत देश परिणामी मुंबई पिछाडीवर आहे. शुटिंगच्या ठिकाणी घ्याव्या लागणार्‍या परवानग्या, स्थानिक गुंडांची दहशत, टॅक्स, चाहत्यांचा होणारा त्रास बघता मुंबईत शूट न करता थेट परदेशी जाऊनच शूट करण्याकडे सिनेमावाल्यांचा कल असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -