Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स पहिले गणितज्ञ आर्यभट

पहिले गणितज्ञ आर्यभट

कलियुगाची ३,६०० वर्षे संपली तेव्हा आपले वय २३ वर्षांचे होते असेही त्यांनी या ग्रंथात म्हटले आहे. यावरून त्यांचे जन्म वर्ष इ. स. ४७६ असावे असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय गणित परंपरेतील प्रथम सहस्रकातील पहिले उल्लेखनीय गणितज्ञ. यांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित माहिती नाही, परंतु त्यांनी आपल्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात कुसुमपूर येथे ज्ञान प्राप्त केल्याचा उल्लेख केला आहे. यावरून त्यांचे अध्ययन आताच्या बिहार राज्यातील पाटणा शहराच्या परिसरात झाले असावे, असा अंदाज आहे. कलियुगाची ३,६०० वर्षे संपली तेव्हा आपले वय २३ वर्षांचे होते असेही त्यांनी या ग्रंथात म्हटले आहे. यावरून त्यांचे जन्म वर्ष इ. स. ४७६ असावे असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. आर्यभटीय या संस्कृत छंदोबद्ध पद्यात लिहिलेल्या त्यांच्या ग्रंथात गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद आणि गोलपाद अशी चार प्रकरणे असून अनुक्रमे १३, ३३, २५ आणि ५० अशी एकूण १२१ पद्ये आहेत.

गीतिकापाद प्रकरणात खगोल गणितातील मोठ्या संख्या थोडक्यात लिहिण्यासाठी अभिनव संख्या लेखनपद्धती दिली आहे. याशिवाय गीतिकापाद प्रकरणात राशी, अंश, कला यांचे परस्परसंबंध, युगपद्धती, ग्रहांच्या गती, अंतर मोजण्याची मापे इत्यादी विषय आहेत. संख्या लेखनपद्धतीत क् पासून म् पर्यंतच्या २५ व्यंजनांच्या किंमती अनुक्रमे १ ते २५ घेऊन ती व्यंजने वर्गस्थानी आणि य्, र्, ल्, व्, श्, ष्, स् आणि ह्या आठ व्यंजनांच्या किंमती अनुक्रमे ३०, ४०, ५०, १०० अशा घेऊन ती व्यंजने अ वर्गस्थानी लिहावी असा नियम आहे. अ, इ, उ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ आणि औ अशा नऊ स्वरांमध्ये लघु-गुरू भेद न करता प्रत्येक स्वरासाठी अनुक्रमे १००, १०२, १०४ अशी एक स्थानीय किंमत आहे. एखाद्या अक्षराने दर्शविलेली संख्या = प्रत्येक अक्षरातील व्यंजनांची बेरीज गुणिले त्या अक्षरातील स्वराची स्थानीय किंमत आणि एखाद्या शब्दाने दर्शविलेली संख्या = त्या शब्दातल्या प्रत्येक अक्षराने दर्शविलेल्या संख्यांची बेरीज.
उदाहरणार्थ, ख्यु घृ या शब्दात ख्यु = ख् + य् + उ आणि घृ = घ् + ऋ
तसेच ख् = २, य् = ३०, घ् = ४, उ = १०४, ऋ = १०६,
त्यामुळे ख्यु घृ = (२+३०)÷१०४ + ४ ÷ १०६= ३,२०,००० + ४०,००,००० = ४३,२०,०००.
ही पद्धत लघु आणि तर्कशुद्ध असली तरी काही संख्यांसाठी येणारे शब्द उच्चारण्यास कठीण आहेत.

- Advertisement -

गणितपाद प्रकरणात अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती या विषयांचा समावेश आहे. यामध्ये सूत्रे कमीत कमी शब्दांमध्ये दिलेली असून सिद्धता दिलेल्या नाहीत. सर्वप्रथम दशमान पद्धतीने एक, दश, शत, सहस्र, अयुत, नियुत, प्रयुत, कोटि, अर्बुद आणि वृन्द अशी दहा संख्या स्थाने दिली आहेत. त्यानंतर वर्ग आणि घन यांच्या व्याख्या भूमिती आणि बीजगणित या दोन्ही संदर्भात देऊन पुढे पूर्णांक संख्यांसाठी वर्गमूळ आणि घनमूळ काढण्याच्या पद्धती दिल्या आहेत. अशा या महान गणितज्ञाचे अंदाजे इ.स. ५५० रोजी निधन झाले.

- Advertisement -