घरफिचर्सदाणे दाणे पर लिखा है...

दाणे दाणे पर लिखा है…

Subscribe

आता निसर्गानंच मानसायला तोंड दिलंय. त्यानेच हात दिलेत. त्यानेच पोट दिलंय.अन पोट म्हणल्यावर भूक आली. भूक म्हणल्यावर माणसाला खाऊ वाटतंय. अन जर त्या भुकेच्या वेळेला माणसाच्या हातात केळ असलं तरी खातंय माणूस. मंग इथं तर तेच्याजवळ एक से एक जबरदस्त खाणे के व्यंजन होते. अन त्या बिचार्‍यानं ते काढले अन खाल्ले तर त्यात एवढी मोट्ठी गल्ती काय? तसं इ असं दुसर्‍याचं खाणं इंडेन माणसाला सवयीचं हायच की. आपली संत मंडळी बी म्हणून गेलीय दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम.

दुसर्‍याचे डब्बे पोचवण्याचंच काम करणार्‍या एका भुकेजलेल्या हंगरीपेट एम्प्लॉयीचा तेच्याच कंपनीने दिलेल्या डब्यातून गाडीवर बसल्या बसल्या खाण्याचे पार्सल डब्बे उघडून खात्यावेळचा व्हायरल झालेला विडिओ मिसरा दाखवूलालता तो बघत बघत आपण वदलो.

अन त्येनं खात असलेला पदार्थ कोनता? ह्येचा अंदाज लावण्याच्या प्रयत्नात असलेला मिसरा आपलं अवलोकन जारी ठिवत खालमानेनंच मोबाइलकडं बघत पुटपुटला सही है

- Advertisement -

झालं… आज बसायला जागा नं मिळालयानं आधीच कारवादून गेलेला आमचा खविस जगताप आरडला
क्या सही है रे मिसरा? अरे दुसर्‍याच्या मुखात जायचं अन्न तुम्ही खाता याला काय अर्थ हाय का? अन अये दाणे दाणेवालेभाई सुनो … त्या दाण्यावर नाम लिव्हलं असलंच ना जेनं ऑनलाईन त्या खान्याचे पैशे भरले असतील त्येचं. तवा असं दुसर्‍याच्या ताटात तोंड घालायच्या सवयीचं समर्थन करनुका तुम्ही.

मिसरा पुन्ना बोलला सही है
जगताप नाक फुगवीतच होता ते बघून आणि उचकविन्याच्या उद्देशाने म्हनलं जगताप ज्येचा डब्बा त्येनं गाडीवर बसू बसू अर्धा हानला त्या बिचार्‍या पैशे भरलेल्या गिराइकानं काही म्हनलानी. तुम्ही का इकडं उगु तम्-तमूलालाव हो.तुमच्या ऑफिसमधी नाही का तसली पब्लिक जिनं तुमच्या डब्यातलं तुम्हाला नं इचारता खातीय अन इतकं खातीय की काई काई बार तर तुमच्या डब्ब्यात हक्काचा भाकर तुकडा असूनदिक्कील तुम्हाला वडापाव खाऊन पॉट भरावं पडतंय ..पडतंय का नाही?

- Advertisement -

सही है मिसरा म्हनला तसं जगताप उचकुन म्हनला की तसं खाणार पब्लिक तुमच्या वळखिची राहतीय… अन तेच्यामुळं ते चलतंय ते. लोक वळखीचा फायदा घेत असतंयच.

मिसरा सही है म्हनण्याआधीच मी माझं घोडं दामटीलं अन इचारलं
जगताप … म्हंजे तुम्हाला असं म्हणायचाय की वळखीच्या लोकांनी बिन इचारता खाल्लेलं माफ असतंय. तर मंग सांगा पैले प्रीपेड अस्ताळा मोबाईलकंपनीवाले तुमचं बॅलन्स खात होते का नाही नं इचारता, बँकवाले हे चार्ज ते चार्ज म्हणू म्हणू खातेतं ते वळखवाले होते का तुमच्या? अन तुम्ही सांगा तुमचं ड्रायविंग लायसन काडताळा,पासपोर्ट काडताळा,तुमच्या दुकानाचं लायसन काडताळा अन तुम्हीच सांगटीलतो तुमच्या लग्नाचं सर्टीफीकिट काढताळा बी … तर तवा ज्येनी ज्येनी तुमचे पैशे खाल्ले ते समदे तुमच्या वळखिचे होते मना की?

आपन सुटलतो आता अन जगताप पार ढेपाळलता. आता आपण मेचक्यातलाच सब्जेक्ट काढलता. आपल्या दरवाजातली व्होल पब्लिक ‘सही है …एकदम करेक्ट बोल्ला बॉस!’च्या पुढी जाऊन ये भी खाताय … वो भी खाताय…ये काम के लिये मेरा इतना पैसा खाया …बिल्डिंग बनाने का परमिशन के लिये इतना खाते….माहीत नसलेल्या गावातले, रात्री-बेरात्री स्टेशन एअरपोर्टवर मिळणारे रिक्शावाले टॅक्सीवाले कैच्या कै पैशे लावून तुमचे पैशे खातेतच की ते?
मीटर फास्ट पळवून खातेत ते? शाळानं हेच्ये त्येच्ये मनूमनू एक्सट्रा एक्सट्राचे पैशे घेऊ घेऊ खातेत ते?
रोड बनविणार खातेत,कंपनीवाले खातेत हे खातेत ते खातेत हर खात्यात खातेत. आता
तुमचं खातेत,आमचं खातेत पासून देश खातेत पर्यंत बात पोचलती.
थोडक्यात खाण्याचा विषय लै पेटलता. आता जगतापसुद्धा हेनी खातेत तेनी खातेतच्या गोष्टी सुरू केल्ता.
आमची नजरानजर झाली तसं मी म्हन्लो
भाई बघा इतकं खाणं खाणं सुरू हाय तिथं त्या भाईनं थोडं खाल्लं. चुकी केली त्याची शिक्षा त्याला मिळली. त्यानं असं दुसर्‍याच्या खाण्यापायी नवकरी घालवली. आता तर त्येला माफ करा. अन बाकी खाणार्‍याला बघा. त्येंच्यवर काय ऍक्शन होतीय का ते बघा
आपला हा ह. भ. प. टाईप डायलॉग येईपरेंत डब्यातली पावनी पब्लिक उतरलती. युलालेलं अगला स्टेशन आपलंच होतं.
मिसरा होता तरी वाडोळ झालं त्याचा सही है आलनी म्हणून त्येच्याकडं बघत इचारलं
काय खाऊलालता रं हा ढेरपोट्या! खाणेवाले आयटम का कूच पता चला
तर मोबाईलमध्ये आलेला तो व्हायरल बाराशेचौदाव्या वेळेला बघत असलेला मिसरा म्हनला मुझे तो व्हेज बिर्याणी लग रही कलर से बाकी तो ये खानेवाला जाने
मंग मी त्याला म्हनलं सही है
स्टेशनला लोकल लागली तसं उतरत बाय बाय मध्ये मी म्ह नलं
बाकीच्याचं माहितनी पण आपण सब अगले साल से खाणे के सिवाय कूच और ना खायेंगे ना खिलायेंगे! हैप्पी न्यू ईअर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -