घरफिचर्सस्मृतिदिन : असा घडला 'गब्बर'

स्मृतिदिन : असा घडला ‘गब्बर’

Subscribe

'कितने आदमी थे' या सिनेमातल्या थरकाप उडवणाऱ्या डायलॉगमधून, अभिनेते अमजद खान आजही आपल्यात जिवंत आहेत.

शोले चित्रपटामध्ये ‘गब्बर’ साकरणारे दिवंगत नेते अमजद खान यांचा आज स्मृतिदिन. “यहाँ से पचास-पचास कोस दूर जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा”… आजही हा डायलॉग ऐकला की आठवतो शोले चित्रपटातील खलनायक गब्बर. मात्र, ही भूमिका साकारणारे अभिनेते अमजद खान यांचा स्वभाव गब्बरच्या अगदी विरुद्ध होता. काहीसा शांत आणि मिश्कील स्वभाव असलेल्या अमजद यांनी, क्रूर गब्बरची भूमिका मात्र तितकीच जिवंतपणी साकारली होती. अमजद खान यांनी अन्य चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या आहेत. मात्र, शोले मधील गब्बर त्यांच्या आयुष्यातील ‘माईलस्टोन’ ठरला. मात्र, अमजद यांना गब्बरची भूमिका सहजासहजी मिळाली नव्हती. अमजद यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज जाणून घेऊया, त्यांच्याविषयीच्या अशाच काही रंजक गोष्टी.

gabbar in sholay

- Advertisement -

असा मिळाला ‘गब्बर’चा रोल

त्याकाळी हिंदी सिनेसृष्टीत खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले डॅनी डेंझोप्पा, यांना सर्वप्रथम गब्बरचा रोल ऑफर करण्यात आला होता. इतकंच नाही तर त्यावेळी ‘स्क्रीन’ मासिकाच्या कव्हर पेजवर शोलेच्या संपूर्ण टीमसोबत डॅनी यांचा फोटोही छापून आला होता. त्यामुळे शोले चित्रपटात डॅनीच गब्बर साकारणार हे जवळपास नक्कीच झाले होते. मात्र, डॅनी यांना त्याचदरम्यान फिरोज खानच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाचे शूटिंग करायचे होते. हे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये असल्यामुळे डॅनी यांना शोले चित्रपट सोडावा लागला. त्याचवेळी सलीम खान यांनी जावेद अख्तर यांना अमजद खान यांचे नाव सुचवले. जावेद अख्तर यांनीही दिल्लीत असताना, एका नाटकामध्ये अमजद यांचा अभिनय पाहिला होता. अशातच सलीम खानने नाव त्याचं नाव सुचवल्यामुळे, अमजद यांना रितसर ऑडिशनसाठी बोलावण्यात आले. ऑडिशन आणि स्क्रिन टेस्ट पास केल्यानंतरच अमजद यांच्या वाट्याला गब्बरचा रोल आला.

amjad khan

- Advertisement -

पाकिस्तानातही गब्बर हिट

१९७५ साली भारतात शोले चित्रपट खूप मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये शोले चित्रपटाने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले होते. पाकिस्तानमध्येही शोले चित्रपट आणि त्यातील गब्बर लोकप्रिय ठरला होता. पाकिस्तानच्या जवळपास सर्वच थिएटरमध्ये शोले रिलीज करण्यात आला होता. अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण शोले चित्रपटाने त्याकाळी पाकिस्तानमध्ये लाखो रुपयांची कमाई केली होती.

२७ जुलै १९९२ रोजी ऱ्हदयविकाराचा झटका आल्यामुळे, ५१ व्या वर्षी अमजद खान यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -