घरफिचर्सउपनगरीय रेल्वेच्या विकासाचे मॉडेल

उपनगरीय रेल्वेच्या विकासाचे मॉडेल

Subscribe

आमच्या सरकारच्या काळात आम्ही उपनगरीय रेल्वेच्या नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढवली आहे. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ११ हजार कोटी रुपये किमतीच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट -३ (एमयूटीपी ३) प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. याअंतर्गत ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंक, पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग कॉरिडोर आणि ४७ नवीन वातानुकूलित उपनगरीय गाड्या समाविष्ट करून अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे सुधारित सेवा वाढवताना नेटवर्कची गर्दी कमी करण्यास मदत होईल.

मुंबई महानगराच्या दर्जास अनुसरून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उपनगरीय व्यवस्थेच्या सुधारणांसाठी पुढाकार घेत आहे. ज्यामुळे प्रवाशांचे समाधान आणि सुरक्षितता, गर्दी कमी करणे आणि भविष्यासाठी पुरेसे नियोजन करणे शक्य होईल. रेल्वे राष्ट्राची जीवनरेखा आहे. मुंबईत ह्याची खरी प्रचिती येते, जेथे उपनगरीय नेटवर्क ‘लोकल ट्रेन’ म्हणून ओळखली जाते व ज्यामुळे मुंबईकर त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळेवर पोहोचतील याची खात्री असते. एकूण ४५९ कि.मी. अंतराच्या नेटवर्कमध्ये दररोज लोकल ट्रेन्स ३ हजारपेक्षा जास्त फेर्‍यांसह ८० लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांची प्रवासी वाहतूक केली जाते. ज्यामुळे ही व्यवस्था जगातील सर्वात व्यस्त शहरी वाहतूक बनली आहे. लोकल ट्रेनमधून टिफिन्स घेऊन जाणारे डब्बावालेही महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

- Advertisement -

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे मिशन मोडमध्ये काम करीत आहे. पादचारी पूल (फूट ओवर ब्रिज -एफओबी), प्लॅटफॉर्म आणि प्लॅटफॉर्मच्या टोकाकडील पादचारी मार्ग आता बजेटच्या आडकाठीशिवाय सर्वाधिक प्राधान्य असलेल्या सुरक्षिततेच्या बाबी मानल्या जात आहेत. यापूर्वी स्टेशनवरील पहिला पादचारी पूल ‘आवश्यक’ आणि त्यानंतरचे ‘प्रवासी सुविधा’ म्हणून मानले जाते. प्रवाशांच्या मुक्त आणि सुरक्षित हालचालींना वाव देण्यासाठी २०१४ पासून ८७ पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. यामध्ये एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या दुर्दैवी दुर्घटनेनंतरच्या ४४ पादचारी पुलांचा समावेश आहे. यावर्षी आणखी ७० पादचारी पूल कार्यान्वित करण्यात येतील तर पुढील वर्षी ५५ पूल कार्यान्वित करण्यात येणार आहेत. पादचारी पुलांचे बांधकाम करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ ८ ते ९ महिन्यांवरून ३ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ट्रेनमध्ये सुरक्षितपणे चढणे आणि बाहेर पडणे सुलभ व्हावे यासाठी आम्ही उपनगरीय विभागातील सर्व स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविली आहे.

बर्‍याचदा प्रवासी एखाद्या गाडीत चढतात आणि ती सुरू होणार आहे याची अजिबात दखल घेत नाहीत. यामुळे त्यांच्या जिवाला आणि आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. त्यावर एक उपाय म्हणून ट्रेन सुरू होत असल्याचे संकेत दर्शविणारा निळ्या रंगाचा दिवा डब्याच्या दरवाजावर लावून नवीन उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांना या माध्यमातून आता पुरेसा इशारा मिळेल. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही या प्रणालीत वाढ करू.

- Advertisement -

आमच्या सरकारच्या काळात आम्ही नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढवली आहे. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ११ हजार कोटी रुपये किमतीच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट -३ (एमयूटीपी ३) प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. याअंतर्गत ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंक, पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग कॉरिडोर आणि ४७ नवीन वातानुकूलित उपनगरीय गाड्या समाविष्ट करून अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे सुधारित सेवा वाढवताना नेटवर्कची गर्दी कमी करण्यास मदत होईल.

२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात सरकारच्या महत्वाकांक्षी योजना दर्शविणार्‍या मुंबईतील एमयूटीपी ३ए, जी उपनगरीय व्यवस्थेच्या नवीन प्रकल्पासाठी ५५ हजार कोटींची अभूतपूर्व घोषणा केली गेली. या अंतर्गत अनेक मार्ग विस्तारित आणि नव्याने समाविष्ट केले जातील. याव्यतिरिक्त, सुधारित सुरक्षितता आणि वेळेचे पालन सुधारण्यासाठी संप्रेषण आधारित रेल्वे नियंत्रण प्रणाली वापरली जाईल. स्थानक सुधारणा आणि वातानुकूलित गाड्या (एसी रेक) खरेदीसाठी देखील निधीचे वाटप केले जाईल.

या शासन काळात, दीर्घ प्रलंबित प्रकल्प जलद गती देऊन पूर्ण केले जात आहेत. दीर्घ काळापासून प्रतिक्षित नेरूळ-सीवूड/बेलापूर-उरण नवीन मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. १९९६-९७ मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे काम खूपच संथ होते. तथापि, २०१४ नंतर काम जलद गतीने केले गेले आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये हा मार्ग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळे सर्व समस्यांचे निराकरण झाले. सध्या प्रकल्पाचा दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे.

विद्यार्थीदशेत लोकल गाड्यांमधून वैयक्तिकरित्या प्रवास केल्यामुळे मला प्रवाशांच्या अडचणी माहीत आहेत. घामेजणारी उष्णता आणि आर्द्रतेवर उपाय म्हणून प्रथमच वातानुकूलित गाडी (एसी रेक) सुरू करण्यात आली. २१० वातानुकूलित गाड्या (एसी रेक) खरेदी करण्यासाठी आम्ही हिरवा कंदील दाखविला आहे.

मुंबई शहर कधीही थांबत नाही, अशा शहरात लोकल ट्रेनची तिकिटे घेण्यासाठी लोकांना लांब रांगेत वाट पाहत बराचवेळ ताटकळत रहावे लागते. अनारक्षित तिकीट खरेदीसाठी यूटीएस मोबाईल अ‍ॅपची सुरुवात करून देऊन दीर्घकालीन वाट पाहण्याचे ते दिवस आता संपले आहेत. २७ स्थानकांवर हाय स्पीड वाय-फाय सुरू केल्यामुळे प्रवाशांची संपर्काची सोय झाली आहे.

आम्ही ट्रेनसाठी प्रतीक्षा कालावधी कमी केला आहे. २०१४ पासून मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये २१४ नवीन सेवा वाढविण्यात आल्या आहेत. भारताची आर्थिक राजधानी आणि राजकीय राजधानी यांच्यात थेट संपर्काची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी दिल्ली आणि मुंबई दरम्यान अतिरिक्त राजधानी सुरु करण्यात आली आहे. ही गाडी एका वेगळ्या मार्गाने जाऊन मध्य भारत आणि आतापर्यंत सेवा न दिलेल्या भागाला सेवा पुरवेल. या राजधानी गाडीची प्रथम फेरीची पूर्ण प्रवासासाठीची तिकिटे पाच तासांपेक्षा कमी विक्रमी वेळेत बुक केली गेली. यावरून लोक या सेवेची किती उत्सुकतापूर्वक वाट पाहात होते हे निदर्शनास येते.

आम्ही वाढविलेल्या लिफ्ट्स, एस्कलेटर्स, स्वच्छता आणि कॅमेर्‍याद्वारे स्थानकांमधील सुरक्षितता वाढली आहे. खरं तर, आम्ही महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. अभिप्राय घेऊन, महिला डब्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थानकांवर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

गेल्या साडेचार वर्षांपासून रेल्वे स्वच्छ, सुरक्षित, जलद आणि अधिक सोयीस्कर बनली आहे. भारतीय रेल्वे प्रत्येक मुंबईकराला चांगली सेवा देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. मुंबई उपनगरीय प्रणाली नवीन भारताच्या दूरदृष्टीचा एक भाग बनेल, याकरिता चांगली सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.

– पियुष गोयल

(लेखक भारताचे केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -