घरमहाराष्ट्रनाशिकशारीरिक गरजा पूर्ण करणारा मनापासून प्रेमच करत असेल का?

शारीरिक गरजा पूर्ण करणारा मनापासून प्रेमच करत असेल का?

Subscribe

महिलांनी आपले विक पॉईंट्स कोणासोबत शेअर करताना आधी त्या व्यक्तीबद्दल खात्री करणे महत्त्वाचे.

सारिका (काल्पनिक नाव ) पतीशी नीट जुळत नसल्यामुळे आणि कौटुंबिक हिंसाचार होत असल्यामुळे कोर्टात केस टाकून माहेरी स्वतः च्या मुलांसोबत राहणारी महिला. दोन वर्षांपासून ऑफिसमधील एका वैवाहिक सहकार्‍यासोबत राजेश (काल्पनिक नाव) संबंधांमध्ये अडकली. मागील चार- सहा महिन्यांपासून त्यांच्यात सतत खटके उडत होते. सारिकाचं म्हणणं होत की राजेश तिला सतत डॉमिनेट करत असतो.

छोट्या गोष्टींवरून दोघात वाद होत होते. यावरून सारिका प्रचंड वैतागून गेली होती आणि तिच्या नकळत ती दुसरीकडे आकर्षित झाली होती. बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणे संजय (काल्पनिक नाव) आता सारिकाला आवडू लागला होता. अजून राजेश सोबतचे संबंध पूर्ण तुटलेले नव्हते; पण, त्या नात्यात आता पहिल्यासारखं माधुर्य राहील नव्हतं. संजयला सारिकाच्या वैवाहिक आयुष्यात झालेल्या त्रासाची पूर्ण कल्पना तिने दिली होती. त्यामुळे संजय देखील आता तिच्या जवळ आलेला होता. परंतु, राजेशचे प्रकरणाबाबत संजय पूर्णपणे अंधारात होता. सारिकाला आता संजयच्या तिच्या नव्याने सुरु झालेल्या नात्यात तो विषय आणायचा नसल्याने तिने देखील याबद्दल काहीही वाच्यता केली नाही.

- Advertisement -

राजेश मात्र सारिकाचे बदललेले वागणे बोलणे ओळखून होता आणि आधीच विचित्र असलेला त्याचा स्वभाव सारिका बाबतीत संशय घेऊ लागला होता. यातच कुठून कस पण राजेशला संजय बाबतीत समजलं आणि त्याने संजयला फोन करून सारिकाच आणि त्याच सर्व प्रकरण सांगून, शिवीगाळ करून, धमक्या देऊन सारिकाच पूर्ण चारित्र्य कस खालच्या दर्जाचे आहे, ती विवाहित पुरुषांना नादी लावते, पैसे उकळते इत्यादी भयानक आरोप तिच्यावर केले.संजय देखील काही फार समजूतदार नसल्याने, किंवा सारिकाला पूर्ण ओळखण्याची त्याची मानसिकता नसल्यामुळे त्याने सारिकाला फोनवरच आपले संबंध संपले असल्याचे सांगितले. त्यातच तू कशी चरित्र हीन आहेस, तू यामुळेच नवरा सोडला आहेस, अजून किती जणांना फसवणार आहेस, तूझ्या सारख्या बायका धंदेवाईक असतात, यासारखे अनेक अपशब्द वापरून तिला अपमानित केले. सारिका सारख्या सुशिक्षित आणि चांगल्या घरातील महिलेला हे सर्व ऐकणं आवाक्या पलीकडचे होते. सारिका पूर्ण कोसळली आणि ती स्वतःच्याच मनातून उतरली होती. तिने तिच्या जवळच्या एका मैत्रिणीला सल्ला विचारला असता तिला धक्कादायक उत्तर मिळाले होते. त्यामुळे ती मनाने अजूनच तुटून गेली. तिची मैत्रीण तिला बोलली की इतकं काही टेन्शन घेऊ नकोस मी तुझं दुसरीकडे सेटिंग करून देते. एक जन आहे माझ्या ओळखीचे ते विचारत होते कोणी रिलेशनशिपसाठी असेल तर सांग. आता मात्र सारिकाच्या सहनशक्तीची हद्द संपली होती. ती सल्ला मागायला आलेली होती. अशा घटना फक्त सारिकाच्याच नाही तर अनेक एकाकी जीवन जगणार्‍या महिलांच्या बाबतीत घडत असतात.महिला खूप पटकन स्वतःच्या समस्या, घरगुती अडचण, वैवाहिक जीवनातील त्रास कोणालाही सांगून मोकळ्या होतात. आपल्या मैत्रिणी, आपल्या सोबतचे सहकारी, आपलेच नातेवाईक, शेजारी यांचेवर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. आपल्या असहायतेचा, मजबुरीचा कोण कसा गैरफायदा घेईल, याचा महिला अजिबात विचार करत नाहीत. आपल्याला थोडीफार मदत करून, अथवा आपल्याला काही प्रलोभन दाखवून कोणाला काय साध्य करायचं आहे, हे समजण्यासाठी सतर्क असणे आवश्यक आहे. अनेकदा आपला कोणताही वाईट हेतू नसताना, गरज नसताना देखील आपण अनैतिक संबंधामध्ये ओढले जाऊ शकतो. त्यामुळे महिलांनी स्वतःबाबतची कोणतीही माहिती, आपले वीक पॉईंट कोणासोबत शेअर करताना त्या व्यक्ती बाबतीत खात्री करणे महत्वाचे आहे. आपल्यावर सासरी अथवा पतीकडून होणारे अन्याय, अत्याचार सांगितल्यामुळे आपल्याला तात्पुरती सहानुभूती मिळते. परंतु, याच माहितीचा अनेकदा गैरवापर, गैरफायदा आपल्याच जवळचे लोक घेतात.

राधिकाचा (काल्पनिक नाव) पती तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही म्हणून सासरच्या नातेसंबंधामधील हर्षद (काल्पनिक नाव) सोबत संबंध प्रस्थापित करते. त्यावेळेस तिला यामध्ये काहीही अनुचित वाटतं नाही. आपण हर्षदला आपल्या पतीपासून होणारा त्रास बिनधास्त सांगितला, हे बरे झाले. त्याने आपल्याला समजून घेतले आणि आपली साथ देतोय, यातच ती हरखून गेली. परंतु सासरच्याच लांबच्या नात्यातील अजून एक- दोन पुरुष मंडळी तिला आडमार्गाने काही अनपेक्षित मागणी करतात. हर्षदचे मित्र तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात तेव्हा तिला खूप अवघडल्यासारखं होत. हर्षदला राधिका जेव्हा यावर जाब विचारते तेव्हा तिला अतिशय हीन दर्जाची उत्तर मिळतात. त्यामुळे यातून तिचा झालेला अपमान, बदनामी याला कस सामोरं जायच यासाठी ती समुपदेशन घेणं पसंद करते. अशा घटना पाहून हेच शिकणे महत्वाचे आहे की, आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करणारा प्रत्येक जन आपल्यावर मनापासून प्रेमच करत असेल, आपल्या विश्वासाला पात्र असेल, असे अजिबात नाही. एखाद्याकडून कोणतीही मदत किंवा साथ मिळविण्यासाठी महिलांनी स्वतःचे प्रॉब्लेम, विक पॉईंट्स अथवा समस्या, रडगाणं सांगणं आवश्यक नसते तर आपण आपल्या सकारात्मक बाबी सांगून, आपलं कार्य कौशल्य दाखवून देखील आपलं स्थान निर्माण करू शकतात. आपण किती आणि कोणासमोर, कशासाठी लाचार व्हायचे हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. महिलांनी संकटांवर मात करण्याची स्वतः ची इच्छा शक्ती जर प्रबळ ठेवली तर त्यांना काहीही अशक्य नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -