घरट्रेंडिंगभेडिया... रक्तपिपासू माणसातल्या जनावराची गोष्ट

भेडिया… रक्तपिपासू माणसातल्या जनावराची गोष्ट

Subscribe

प्रत्येक माणसामध्ये एक जनावर दबा धरून बसलेलं असतं, समाज, व्यवस्था आणि कायद्याच्या साखळदंडांनी माणसातलं हे जनावर जेरबंद राहतं, माणसातलं हे जनावर ज्यावेळी त्याच्यातल्या माणूसपणावर भारी पडतं त्यावेळी विपरित परिस्थिती निर्माण होते. अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडीया’ तही माणसांतला हा हिंस्त्र लांडगा अर्थात भेडीया (वरून धवन) प्रेक्षकांवर अंधारल्या थिएटरहॉलमध्ये अचानक सोडला जातो. स्वतःमधल्या भेडियासोबत माणसांच मनातल्या मनात द्वंद्व सुरू असतं, कधी माणूस जिंकतो तर कधी त्यातलं जनावर….असंच द्वंद्व माणूस आणि निसर्गातही सुरू असतं. माणसातल्या जनावराला ओरबाडून खाण्याची सवय असते, जंगलातली हिंस्त्र पशू असं करत नाहीत, त्यांची शिकार ही त्यांची जगण्याची गरज असते. मात्र माणूसाची भूक त्याहून मोठी असते. त्यामुळे निसर्ग अर्थातच वनसंपदा आणि माणूस यांच्यातही एक अघोषित युद्ध कायम सुरू असतं. पडद्यावरचा हा भेडिया निसर्गाच्या बाजूनं या युद्धाच्या मैदानात उतरतो.

भेडियामध्ये वरून धवन (भास्कर) ला ईशान्येकडील वनसंपन्न राज्यातून रस्ता साकारण्याचं प्रोजेक्ट मिळतं. त्यासाठी जंगलतोड करावी लागणार आहे. या जंगलात हिंस्त्र भेडिया आहे. जो जंगल जमिन वाचवण्यासाठी माणसांच्या विरोधात मान वर करून जोरदार केकाटून रणशिंग फुंकतो. हा भेडिया माणसांमध्ये दाखल होतो. माणसाचं हळू हळू जनावर होत जाणं हे पडद्यावर व्हुज्युअल इफेक्ट्समुळे कमालीचं परिणामकारक ठरतं. तर वरून धवनने त्यासाठी देहबोलीचा केलेला चपखल वापर या सीनमधला यांत्रिकी कृत्रिमपणा पुसून टाकतो. वरूनच्या जनावरमिश्रीत अभिनयासाठी भेडिया पहायला हवा. अमर कौशिकनं याआधी स्त्री बनवला होता. त्यानंतर चार वर्षानंतरचा हा भेडिया अंगावर येतो. सस्पेन्स, ‘स्त्री’ मधलं थ्रीलर, क्लायमॅक्समध्ये येणारा ट्विस्ट,हॉरर असं सगळं भेडियामध्येही  जसच्या तसं अमरनं उतरवलेलं असतं.

- Advertisement -

नेमॅटोग्राफीत ईशान्यकडील राज्यातल्या डोंगर दर्‍यांची अंधारखोलीतली भेसूर सांजवेळ जिष्णु भट्ट्ाचार्यने पुरेपूर पडद्यावर उभारलेली असते. व्हिएफएक्स आणि पार्श्वसंगीतामुळे सिनेमाला एक खोली मिळते. भेडीयामध्ये केलेले व्हीएफएक्सचा वापर त्यामुळेच कुठंही कृत्रिम आढळत नाही. भेडिया ही ‘स्त्री’ सारखींच एक ब्लॅक कॉमेडी असते. अमर कौशिकच्या सिनेमांमध्ये विनोद आणि थ्रीलरचं संतुलन राखलेलं असतं. भेडिया त्यामुळेच परिणाम साध्य करतो. सिनेमाचं कथानकाचा जीव छोटासा असतानाही केवळ पटकथा संवादांतून सिनेमा तरला जातो. भेडियाची आपली ओळख असते ती ‘द वूल्फ’ सारख्या हॉलीवूडपटांमुळे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून हा भेडियात हिंदी पडद्यावर घुसखोरी करतो. भेडियाने माणसांच्या जगात घुसखोरी केलेली असते कि माणसाने या जनावरांच्या घरात शिरकाव केलेला असतो, हा जुनाच प्रश्न भेडिया पुन्हा समोर आणतो. रुड्यार्ड किपलिंगच्या ‘हिंदीत आलेल्या ’द जंगल बुक’मधल्या गुलजारांच्या ‘जंगल जंगल बात चली है, पता चला है…’  या शीर्षक गाण्याचा वापर वेगळ्या अर्थानं भेडियातून समोर येतो.

एकाच वेळेस कॉमेडी, फँटसी, भीती, धक्कातंत्र चित्रपटातून साध्य केलं जातं. कथेचा जीव छोटा असल्यानं कथानक रेंगाळण्याचा धोका सिनेमाचा पडदा व्यापून असल्यानं उत्तरार्ध काहीसा संथ होतो किंवा अनावश्यक ताणला जातो. या रेंगाळण्यातून सुटका होण्याची वाट पहावी लागते. तरीही ब्लॅक किंवा ग्रे शेडमधली वूल्फ कॉमेडी असं भेडियाला म्हणता येईल. जनावर आणि माणसांमधील सीमारेषा वरून धवनच्या अभिनयाने पुसली जाते. हॉलिवूडमध्ये दिग्दर्शिका ‘नॅथली बियान्चेरी’नं  गेल्या वर्षीच ‘वूल्फ’ बनवला होता. त्या आधी १९९४ मध्ये अमेरिकन दिग्दर्शक ‘माईक निकोल्स’नं याच नावांनं रोमँटीक हॉररपट बनवलेला असतो.

- Advertisement -

उल्लेखनीय म्हणजे यात हिंदी अभिनेते ओम पुरी यांनीही एक व्यक्तीरेखा साकारलेली असते. २०२२ मध्ये हे काम अमर कौशिकनं हिंदीत केलेलं असतं. जनावरांच्या भावना, इच्छा, जोडीदारासोबतच्या अपेक्षा माणसांपेक्षा वेगळ्या नसतात, भेडियामधून दिल्या जाणार्‍या अनेक संदेशांपैकी हाही एक महत्वाचा संदेश असतो. माणूस आणि जनावर यातली धूसर सीमारेषा भेडियामध्ये पुसली जाते. माणूस जनावर बनत जातो आणि जनावरातून माणूस साकारला जातो. हे मानसिक आणि देहाच्या पातळीवरही होत जातं, हा अनुभव पडद्यावर पाहाण्यासाठी भेडिया पहायला हवा. दर्जेदार थ्रीडी इफेक्टमुळे चित्रपटातील दृष्ये अपेक्षित परिणाम साध्य करतात, अभिनेत्री क्रीती सेननला पडद्यावर पुरेशी जागा मिळालेली नाही, मात्र मिळालेल्या जागेत ती पारिणाम सोडून जाते. अभिषेक बॅनर्जीनं आपल्या केविलवाण्या चेहर्‍याचा अभिनय स्त्रीनंतर इथंही कायम ठेवला आहे. दिपक डब्रियाल आणि इतर सहकलाकारांंची चांगली साथ मिळाली आहे. पडद्यावरच्या या भेडियांचं  तारस्वरात केकाटणं आणि माणसांच्या दुःखातलं आक्रंदन यातला फरक भेडिया नाहिसा करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -