घरफिचर्सवेळेचे प्रामाणिक आणि नम्र नियोजन

वेळेचे प्रामाणिक आणि नम्र नियोजन

Subscribe

वेळ ही निसर्गाचा अमूल्य ठेवा. वेळेसोबत जो स्वतःला बदलतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. मात्र, या २४ तासांचे मूल्य समजणे आणि त्याचा सदुपयोग करणे हे कोणत्या आव्हानापेक्षा मोठे नाही. आपण नेहमीच वेळेला दोष देतो. अमूक कामासाठी वेळच नाही मिळाला वगैरे. खरंतर वेळ ही सर्वांसाठी सारखीच असते.

एक गृहिणी नेहमी तिच्या कुटुंबालाच प्राधान्य देते. ती आपल्या कामांमध्येही त्यानुसार बदल करून दिनक्रम ठरवते. जसे शाळेत जाणार्‍या मुलांच्या डब्यातील खाऊचा मेन्यू ठरवणे, त्यासाठीची पूर्वतयारी करणे, सकाळसाठी रात्रीच काहीतरी तयार करून ठेवणे, मग त्यांच्या वेळेनुसार सकाळी उठणे आणि तयारी करण्याची आखणी करणे. यामध्ये एकही मिनिट मागेपुढे झाले तर सगळी गडबड होऊ शकते.

वेळ ही निसर्गाचा अमूल्य ठेवा. वेळेसोबत जो स्वतःला बदलतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. मात्र, या २४ तासांचे मूल्य समजणे आणि त्याचा सदुपयोग करणे हे कोणत्या आव्हानापेक्षा मोठे नाही. आपण नेहमीच वेळेला दोष देतो. अमूक कामासाठी वेळच नाही मिळाला वगैरे. खरंतर वेळ ही सर्वांसाठी सारखीच असते. परंतु, आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने करू शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला जाग येते, तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. असे होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या २४ तासांच्या वेळाचे आणि कामाच्या नियोजनाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. हे काम पूर्णतः प्रामाणिकपणे आणि नम्रतेने केले पाहिजे. यामुळेच समजू शकेल की नक्की गडबड कुठे होते आहे.

- Advertisement -

या लेखात आपण वेळेसोबत जाण्याचा तसेच यश मिळवण्याचा नेमका अर्थ काय असतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी सर्वात आधी आपण कशाला प्राधान्य द्यायला हवे हे जाणून घेऊया. प्राधान्य देणे म्हणजे आयुष्यात उद्दिष्ट निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करणे होय. आजकाल प्रत्येक व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कामात व्यग्र असताना दिसतो. जर कोणी नोकरी करत असेल तर भावी आयुष्याच्या सुरक्षिततेची आणि कुटुंबियांची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडण्याचा त्याचा उद्देश असतो. मात्र, आपल्या या जबाबदारीला पार पडताना तो इतका समाधानी आणि आनंदी असतो? हा विचार करण्याचाच विषय आहे. आपण आपला दिवस विविध गोष्टींना प्राधान्य देऊन आखतो. जसे की एखाद्या विद्यार्थ्यासाठी अभ्यास करणे आणि करिअर करणे हे प्राधान्य असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील प्राधान्य हे त्याची इच्छा, वय, साधनसामुग्री, योग्यता आणि संधी यावर आधारित असते. आता प्रश्न असा उपस्थित होतो की हो सगळं कोण ठरवतं. तर स्पष्ट आहे की, मी स्वतःच हे ठरवतो. प्रामुख्याने जेव्हा आपल्याला एखाद्या कामात अपयश येते, तेव्हा आपण यासाठी दुसर्‍याला दोष देतो. खरंतर कोणतेही कार्य करण्याचा अंतिम निर्णय हा आपलाच असतो. यासाठी इतर हे केवळ मार्गदर्शक किंवा सहकार्‍याच्या भूमिकेत असतात.

एक गृहिणी नेहमी तिच्या कुटुंबालाच प्राधान्य देते. ती आपल्या कामांमध्येही त्यानुसार बदल करून दिनक्रम ठरवते. जसे शाळेत जाणार्‍या मुलांच्या डब्यातील खाऊचा मेन्यू ठरवणे, त्यासाठीची पूर्वतयारी करणे, सकाळसाठी रात्रीच काहीतरी तयार करून ठेवणे, मग त्यांच्या वेळेनुसार सकाळी उठणे आणि तयारी करण्याची आखणी करणे. यामध्ये एकही मिनिट मागेपुढे झाला तर सगळी गडबड होऊ शकते. म्हणजेच एकेका मिनिटाचे व्यवस्थितपणे ती नियोजन करते. याप्रकारे एका गृहिणीच्या जीवनातील प्राधान्य थोडं वेगळे असू शकते. यामुळे हे सिद्ध होत की, जोवर आपल्याला आपली भूमिका स्पष्ट होत नाही, तोवर आपण वेळेला आणि त्याच्या सोबतच्या कामाला समजू शकणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आपला प्राधान्यक्रम गोष्टींची यादी तयार करणे, सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. आता आपल्याला हे ठरवायचे आहे की सर्वात जास्त महत्त्वाच काय?

- Advertisement -

-रितू शर्मा

(लेखिका बीईंग माईंडफूल या मासिकाच्या संपादिका आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -