घरफिचर्सधडकी भरवणारी प्रेमकथा !

धडकी भरवणारी प्रेमकथा !

Subscribe

मी गौरवची लव्ह स्टोरी ऐकत होतो. तोही रंगात येऊन मनापासून सांगत होता. माझ्या मनाची मात्र घालमेल सुरू होती. त्याचं प्रेम खरे आहे की खोटे, ते काहीच कळतं नव्हतं. फेसबुकवरून काहींचे प्रेम जमले आणि त्यांची लग्ने झाली असे ऐकले होते, पण त्याचबरोबर बर्‍याच मुलींची फसवणूकही झालेली आहे.

मी विदर्भ-एक्सप्रेसमधून नागपूरहून मुंबईला येत होतो. वर्धा स्टेशनवर गाडी थांबताच मी जनरल कोचमधून स्लिपरला बसलो. तिथे माझी एका आसामी मुलाशी ओळख झाली. त्यांचं नाव गौरव होतं. मी त्याला मराठीत विचारले, भाऊ कुठे जात आहात.? वेटिंग आहे का? असं बोलल्यानंतर तो लगेच मला म्हणाला, भाई मुझ से आप हिंदी या अंग्रेजी मे बात करो. तेव्हा मी हिंदीतून विचारपूस केली. गाडी सुटतेवेळी एक मराठमोळी मुलगी त्याला बाय करून फ्लाईंग किस देत निघून गेली.

जेव्हा गाडी सुरु झाली तेव्हा लगेच मी त्याला विचारलं, भाई आप वर्धा के हो क्या ? तो नाही म्हणाला. मी विचारले, भाई तो कहा के हो आप? मैं वैसे तो आसाम का रहनेवाल हूँ, लेकीन पिछले कुछ दिनों से मैं गोवा में गैरेज मेकॅनिक का काम करता हूँ….त्या नंतर मी त्याला प्रश्न केला, भाई आप वर्धा किस लिए आये थे, तो थोडा थांबला. स्मितहास्य करत बोलला, भाई आप को बताना जरुरी है क्या ? मी गप्प बसलो. थोड्या वेळाने तोच हसत बोलला, भाई मैं अपने गर्लफ्रेंड को मिलने आया था. आप ने नही देखा क्या, जो लड़की मुझे बाय कर के गयी, ओ मेरी गर्लफ्रेंड है. ओ मेरी बेगम बननेवाली हैं. माझे डोळे थोडे विस्फारले. मी म्हणालो, भाईसाहब मैं कुछ समझा नही, त्यानंतर त्याने हसत हसत पूर्ण लव्हस्टोरी सांंगायला सुरुवात केली. तो म्हणाला, पिछले दो सालों से वर्धा की एक लड़की से फेसबुक पर पहचान हुई. बातों का सिलसिला शुरू हुआ और देखते ही देखते उससे प्यार हो गया…दो साल बाद मैं आज उसके माता-पीता को मनाने आया था. माशाल्ला खुदाने मेरी मुराद सुनली है. उसके माता-पिताने हमारे प्यार को स्वीकार कर लिया है और शादी के लिए राजी भी हो गये.

- Advertisement -

मला त्याची भन्नाट लव्ह स्टोरी ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. मनात चित्रविचित्र विचार येऊ लागले. कारण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून बर्‍याच मुलींची फसवणूक होत असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. ट्रेनच्या भन्नाट वेगासोबत गौरवची भन्नाट लव्ह स्टोरी ऐकून माझे डोके चक्रावून गेले होते. कारण त्याने त्याचे नाव गौरव सांगितले होते, तोंडातून तो माशाल्ला, अल्ला ने मेरी मुराद सुन ली, म्हणत होता. त्यामुळे माझ्या मनात विविध शंकाचा पिंगा सुरू झाला होता. गौरव मूळचा आसामचा, पण त्याने त्या मुलीसाठी थेट विदर्भ गाठले होते. तिच्या सकट तिच्या आईवडिलांना लग्नासाठी राजी केले होते. एका उच्चभ्रू परिवारातील मुलगी मेकॅनिक म्हणून काम करणार्‍या मुलाशी लग्न करायला तयार झाली होती. मला तर हा मामला काही तरी वेगळाच वाटत होता.

मी गौरवची लव्ह स्टोरी ऐकत होतो. तोही रंगात येऊन मनापासून सांगत होता. माझ्या मनाची मात्र घालमेल सुरू होती. त्याचं प्रेम खरे आहे की खोटे, ते काहीच कळतं नव्हतं. फेसबुकवरून काहींचे प्रेम जमले आणि त्यांची लग्ने झाली असे ऐकले होते, पण त्याचबरोबर बर्‍याच मुलींची फसवणूकही झालेली आहे. त्यांचे पुढे खूप हाल झालेले ऐकले होते. त्यांच्या परतीचा मार्ग बंद झालेला होता. त्या मराठी मुलीच्या भवितव्याबद्दल मला चिंता वाटू लागली होती. इतक्या दूरवर राहणार्‍या त्या मुलावर विश्वास ठेवून त्या मुलीच्या आईवडिलांनी लग्नासाठी कसा काय होकार दिला. मी याच मुलाशी लग्न करणार असे त्या मुलीने ठरवून टाकले. त्या मुलीला त्याची काही माहितीही नव्हती. केवळ फेसबूकवर त्यांची ओळख होती. गौरवची लव्ह स्टोरी ऐकली. मला काही झोप लागेना. मुंबईत सीएसएमटीला गाडी येऊन थांबली. गौरव म्हणाला, नितीनभाई आप को शादी में जरुर आना है. मी हो म्हणालो, पण त्या मुलीचे पुढे चांगले होईल की वाईट, या शंकेचा भुंगा मात्र माझी पाठ सोडायला तयार नव्हता.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -