घरफिचर्सतृप्ती उपहारगृह

तृप्ती उपहारगृह

Subscribe

या उपहारगृहामधील पदार्थ खूप स्वादिष्ट व रुचकर असतात. तसेच त्या उपहारगृहाची सेवा झटपट असते. त्यामुळे कितीही गर्दी असली तरी रांग लावून तेथेच जावेसे वाटते.

मला खवय्येगिरीची खूप आवड आहे. कोणत्या हॉटेलात कुठला पदार्थ चांगला मिळतो याची माहिती हॉटेलात शिरण्यापूर्वी असली पाहिजे म्हणजे ऑर्डर देऊन पदार्थ मागविणे सुलभ जाते. मनाचा हिरमोड होत नाही. तसेच आपल्याला त्या पदार्थाचा मनमुराद आनंदही लुटता येतो. मोठी अनेक हॉटेल्स आहेत. काही हॉटेलांची स्वतःची अशी खासियत असते. प्रत्येक हॉटेलमध्ये जाणे शक्य नसते.

अशा परिस्थितीत त्यातल्यात्यात एखादे हॉटेल चांगले आहे असे म्हणणे म्हणजे जिकिरीचे व दुसर्‍या हॉटेलवर अन्यायकारक आहे म्हणजे न.चि.केळकर रोडवरील, शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या जवळचे व प्लाझा थिएटरच्या समोरचे तृप्ती उपहारगृह होय. हे उपहारगृह सकाळी ९:४५ ते रात्री १०:१५ पर्यंत अखंड चालू असते. सकाळच्या वेळी नाश्त्यासाठी मराठी खाद्यपदार्थ, उपवास पदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ असतात. दु

- Advertisement -

पारच्या वेळी मराठी जेवण थाळी, भोजन थाळी असे भोजन थाळीमध्ये पोळी किंवा पुरी, भाजी, उसळ, भात, पापड, लोणचे, कोशिंबीर, गोड पदार्थ असतो. याशिवाय उपहारगृहात निरनिराळे स्टार्टर्स, भाताचे विविध प्रकार, पंजाबी भाज्या, नूडल्स, तंदूरी, सँडविच, पावभाजी आता सर्वांना आवडणारा पिझ्झा (चीज व्हेज, चीज जैन, तृप्ती स्पेशल वगैरे) पदार्थ असतात. हे उपहारगृह सन १९६५ पासून सुरू झाले. या उपहारगृहाची ५० वर्षांची यशस्वी व गौरवतेची कारकीर्द आहे. तसेच पुढेही चालू राहणार आहे. तृप्तीमधील पदार्थ खूप स्वादिष्ट व रुचकर असतात.

तसेच त्या उपहारगृहाची सेवा झटपट असते. त्यामुळे कितीही गर्दी असली तरी रांग लावून तेथेच जावेसे वाटते. उपहारगृहाची स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. त्या उपहारगृहातील पदार्थाचे दरही वाजवी व माफक आहेत. या सर्व दृष्टिकोनातून मला तृप्ती उपहारगृह फार आवडते. कधी दादरला खरेदीसाठी किंवा इतर कामासाठी आलात तर जरूर तृप्ती उपहारगृहाला भेट द्या व मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या.

- Advertisement -

कसे जायचे- मध्य किंवा पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वेस्थानकावर उतरून पश्चिमेला शिवाजी नाट्यमंदीराच्या जवळ आणि प्लाझा सिनेमागृहाच्या समोर

– वृंदा वसंत हरयाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -