घरफिचर्सतुम्हाला माहित आहे का?, मायकल जॅक्सनला व्हायचे होते 'स्पायडरमॅन'

तुम्हाला माहित आहे का?, मायकल जॅक्सनला व्हायचे होते ‘स्पायडरमॅन’

Subscribe

संगीत क्षेत्रातील अनेक रेकॉर्ड मायकलने मोडले. ६० , ७०, ८० च्या दशकात त्याची गाणी प्रसिद्ध होती. १९८३ साली आलेला थ्रिलरचा अल्बम फारच गाजला. पण तुम्हाला मायकलच्या या गोष्टी माहित आहेत का?

किंग ऑफ पॉप अशी ओळख मिळवलेल्या मायकल जॅक्सनचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी इंडियानामधील गॅरीमध्ये झाला. मायकलचे वडील जोसेफ जॅक्सन हे बॉक्सर, स्टीलवर्कर आणि गिटारवादक होते. त्यांना संगीताची विशेष आवड असल्यामुळेच मायकलमधील कलेला वाव मिळाला. मायकलचा आवाजच नाही तर त्याचे नृत्यकौशल्यही चांगले असल्यामुळे तो अल्पावधीत प्रसिद्ध झाले. संगीत क्षेत्रातील अनेक रेकॉर्ड मायकलने मोडले. ६० , ७०, ८० च्या दशकात त्याची गाणी प्रसिद्ध होती. १९८३ साली आलेला थ्रिलरचा अल्बम फारच गाजला. पण तुम्हाला मायकलच्या या गोष्टी माहित आहेत का?

अशी झाली जॅक्सन बँडची निर्मिती

१९६५ साली मायकचे वडील जोसेफ जॅक्सन यांनी त्यांच्या कुटुंबातील बच्चेकपंनीला घेऊन एका बँडची निर्मिती केली. या बँडचे नाव जॅक्सन बँड होते. या बँडमध्ये मार्लोन, जॅकी, टिटो आणि जेरमेन होते. वयाच्या ५ व्या वर्षी मायकलने स्टेजवर गायला सुरुवात केली.

- Advertisement -
jackson_band
जॅक्सन बंधू, जॅक्सन बॅंड

वडिलांचा होता त्रास

मायकलचे आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. त्याच्या वडिलांच्या करिअर घडवण्यामागे मोठा हात असला तरी त्याचे वडिलांसोबतचे नाते चांगले नव्हते. मायकलने त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील केली होती. त्याने एका मुलाखतीत या विषयी सांगितले होते. मायकलच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत चाललेल्या प्रसिद्धीमुळे त्याने अधिकाधिक करावे हा त्याच्या वडिलांचा अटट्हास होता. म्हणून ते त्याला मारायचे असा धक्कादायक खुलासा त्याने केला होता.

मायकल जॅक्सन संपूर्ण कुटुंबासोबत
मायकल जॅक्सन संपूर्ण कुटुंबासोबत (सौजन्य- पिंट्रे्सट)

मायकलचा त्वचेचा रंग म्हणून बदलला

मायकलच्या बदलत्या रंगावरुन त्याच्यावर टीका झाली होती. मायलकलकर वर्णभेदाचा आरोप करण्यात आला. त्याने स्किन ब्लिचींग केले, त्याला त्याच्या काळ्या वर्णाची लाज वाटते, असे अनेकांनी म्हटले. पण त्याला त्वचेचा आजार झाला होता. विटीलिगो हा आजार झाला होता. ज्यामुळे त्याच्या शरीरावर पांढरे चट्टे उठले होते. त्यामुळेच त्याचा रंग बदलला होता.

- Advertisement -
michael-jackson-changing-faces
मायकल त्वचेच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळेच त्याच्या त्वचेच्या रंगात बदल होत गेला

मायकल जॅक्सनला होती प्राण्यांची आवड

मायकल जॅक्सनला प्राणी पाळण्याची हौस होती. या पाळीव प्राण्यांमध्ये उंदीर,साप, पक्षी, वाघ, कुत्रे आणि मांजरी होत्या. त्याचा सगळ्यात आवडता प्राणी चिंपाझी होता. त्याच्याकडे असलेल्या चिंपाझीचे नाव बबल असे होते.

मायकलला व्हायचे होते ‘स्पायडरमॅन

९० च्या दशकात कॉमिक्सचे प्रचंड वेड होते. त्यातील स्पायडरमॅन हे मायकलचे आवडते पात्र होते. ज्यावेळी मार्वेल कॉमिकने दिवाळखोरी घोषित केली. त्यावेळी मायकलला मार्वेल कंपनी विकत घ्यायची होती. विशेष म्हणजे त्याला स्पायडरमॅन सिनेमाची निर्मिती करायची होती आणि विशेष म्हणजे त्याला त्यात स्पायडरमॅनची भूमिका साकारायची होती. पण मायकल यामध्ये अयशस्वी ठरला आणि भूमिका टॉबी मॅग्वायरला मिळाली.

spiderjackson
मायकलच्या फॅन्सनी तयार केलेला फोटो

काय करतात मायकलची मुलं?

मायकलने १९९४ साली लिसा मॅरीशी लग्न केले. जे फक्त १९ महिने टिकले. त्यानंतर त्यांनी १९९६ साली डोबराह जेनी रोव्ह हिच्याशी लग्न केले. या दोघांना दोन मुलं झाली जॅक्सन ज्युनिअर, प्रिन्स जॅक्सन, मुलगी पॅरिस मायकल कॅथरिन जॅक्सन दुसऱ्या पत्नीशी मायकलने १९९९ च्या घटस्फोट घेतला. मायकलची मुलगी पॅरिस अभिनेत्री असून ती गाते. तर ज्युनिअर जॅक्सन आणि प्रिन्स जॅक्सन मात्र या क्षेत्रापासून लांब आहे.

Michael-Jackson-with-children
मायकल जॅक्सन मुलांसोबत, फोटोत मायकल ज्युनिअर, पॅरिस आणि छोटा प्रिन्स
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -