नुकतेच व्हॉट्सअॅपने आपले डार्क मोड फीचर सर्व अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी अपडेट केले आहे. डार्क मोड फीचरच्या मदतीने यूजर्सना व्हॉट्सअॅप यूज करताना डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही, असे व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे. याशिवाय मोबाइलचा ब्राइटनेसचा कमी वापर करावा लागेल. सर्वप्रथम तुम्हाला गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट वर्जन डाउनलोड करावे लागेल किंवा अपडेट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही आपल्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप फिचरचा वापर करू शकता.
व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे की, एन्ड्रॉइड १० आणि आयओएस १३ चे युजर्स याला डिफॉल्ट म्हणूनही सेट करू शकतात. तसेच मीडिया रिपोर्टनुसार असे निदर्शनास आले की, सध्या काही लोक व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतरही हे फिचर वापरू शकत नाहीत.
Finally. Dark mode on WhatsApp. #DarkMode pic.twitter.com/o4Ee5H7qpW
— WhatsApp Inc. (@WhatsApp) March 3, 2020
आयओएस आणि अॅन्ड्रॉइड १० यूजर्सनी असे वापरा फीचर
– पहिल्यांदा व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट वर्जन अपडेट किंवा डाऊनलोड करा
– मग मोबाइल सेटिंग्स हा पर्याय निवडा.
– त्यानंतर डिस्प्ले आणि ब्राइटनेसचा पर्याय निवडा.
– डार्क मोड सुरू करा.
– मोबाइलमध्ये डार्क मोड ऑप्शनची निवड केल्यानंतर व्हॉट्सअॅप डार्कमोडचे फिचर मोबाइलमध्ये अॅक्टिव्हेट होईल.
अॅन्ड्रॉइड ९ आणि त्याआधीचे अॅन्ड्रॉइडचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी
– सर्वात आधी व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट वर्जन डाउनलोड किंवा अपडेट करा.
– त्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जा.
– मग चॅटमध्ये जाऊन थीम ऑप्शनची निवड करा.
– डार्क मोड ऑप्शन सिलेक्ट करा.