घरफिचर्स'या' कारणामुळे गुदगुल्या केल्यावर येतं हसू!

‘या’ कारणामुळे गुदगुल्या केल्यावर येतं हसू!

Subscribe

माणूस गुदगुदल्या केल्यावर का हसतो, याविषयीचं नेमकं स्पष्टीकरण जगातील काही संशोधकांनी दिलं आहे.

‘हसणं’ हे आरोग्यासाठी लाभदायक असतं असं म्हटलं जातं. हसत राहिल्याने तुमचं आयुष्य वाढतं असाही अनेकांचा समज असतो. बहुतांशी लोकांना गुदगुल्या केल्यामुळे हमखास हसायला येतं. एखाद्या दु:खी किंवा उदास व्यक्तीलाही तुम्ही गुदगुल्या करुन हसवू शकता. मात्र, गुदगुल्या केल्यावर आपल्याला नेमकं का हसायला येतं? असा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय का? एखाद्याने आपल्याला गुदगुल्या केल्यावर आपण प्रसंगी हसायला लागतो. गुदगुल्या करणार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण हसत राहतो. मात्र, यामागचं नक्की कारण काय किंवा गुदगुदल्या केल्यावर हसायला का येतं? याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहेत. माणूस गुदगुदल्या केल्यावर का हसतो, याविषयीचं नेमकं स्पष्टीकरण जगातील काही संशोधकांनी दिलं आहे.


वाचा : चक्क विमानावर छापले ‘चुकीचे’ नाव!

या संशोधकांच्या मते, हसणे ही खरंतर एक बचावात्मक क्रिया असते. गुदगुदल्या केल्यानंतर त्वरित ही क्रिया करण्याचे आदेश आपला मेंदू आपल्याला देत असतो. वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार एखादा माणूस जेव्हा आपल्याला गुदगुल्या करतो तेव्हा खरंतर ती आपल्यासाठी त्रासदायक आणि नकोशी असते. त्यामुळे आपण त्या स्थितीतून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, इवॉल्युशनरी बायोलॉजिस्ट आणि न्युरोसायंटिस्ट यांच्या म्हणण्यानुसार गुदगुल्या केल्यानंतर मेंदूतील हायपोथॅलॅमस हा भाग आपल्याला हसण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यामुळे गुदगुल्यांचा आपल्याला त्रास होत असला तरी आपण त्याला हसतच प्रतिक्रिया देतो.


पाहा : मुंबईतील LIVE  विसर्जन मिरवणूक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -