घरफिचर्सइतिहासाचे साक्षीदार मंगलदास मार्केट

इतिहासाचे साक्षीदार मंगलदास मार्केट

Subscribe

या मार्केटमध्ये दरदिवशी सुमारे १ लाख लोक ये-जा करतात, असे म्हटले जाते. येथील गर्दी बघितली तर त्यात अतिशयोक्ती नक्कीच नाही. या मार्केटमध्ये केवळ कपडे मिळतात. कुठल्याही प्रकारचे रेडीमेट कपडे मार्केटमध्ये उपलब्ध नव्हते. मात्र आता महिलांचे लेगिन आणि कुर्तीही आता मिळू लागले आहेत. हे घाऊक मार्केट असल्यामुळे किरकोळ विक्रीसाठी येथील दुकानदार सहसा तयार नसतात. त्यामुळे कोणी घाऊक खरेदीदार येथे आला असेल तर किरकोळ खरेदीदाराला फारसा भाव मिळत नाही.

भारतीय स्वातंत्र्यात कपडा या निर्जिव वस्तूने महत्त्वाची भूमिका बजावली हा इतिहास सर्वांनाच माहित आहे. भारतातून कच्चा माल इंग्लंडला नेऊन त्याचे तयार झालेले कापड इंग्रज भारतात विकत. त्यातून इंग्रजांनी भारताची लूट चालवली होती. त्यामुळे स्वातंत्र्य सेनानींनी स्वदेशीचे आंदोलन सुरू केले. परदेशातून येणारे मँचेस्टर म्हणजेच मांजरपाट कापड खरेदी करायचे नाही. त्याऐवजी खादी वापरायची, असे या आंदोलनाचे स्वरूप होते. हे आंदोलन होत असताना मुंंबईच्या मंगलदास मार्केट हे त्याचे खरे साक्षीदार होते. साधारणत: १२५ वर्षांपूर्वी या बाजाराची स्थापना इंग्रजांनी केली. त्याचा मुख्य उद्देश हा इंग्लंडमधून येणारे कापड मुंबईत तसेच भारतात विकणे हे होते. त्यावेळी मंगलदास मार्केटमध्ये मँचेस्टरहून आलेल्या कापड्याची विक्री होत होती.

- Advertisement -

हे कापड विकत घ्यायला मार्केटमध्ये गर्दी व्हायची. स्वस्त आणि फिनिशिंग असलेले मांजरपाट त्याकाळी मुंबईत चांगलेच प्रसिद्ध झाले होते. ते घाऊक मिळण्याचे एकमेव ठिकाण त्यावेळी मुंबईतील मंगलदास मार्केट होते. त्यामुळे त्याकाळी मुंबई आणि मुंबई परिसरातील अनेकजण या मार्केटमध्ये खास मांजरपाट कापड खरेदी करण्यासाठी येत होते. या मँचेस्टर अर्थात मांजरपाट कापडाने मंगलदास मार्केटला खरी ओळख दिली. मात्र स्वदेशीचे आंदोलन सुरू झाले आणि विशेषत: गांधीजींनी खादीचा पुरस्कार करण्यास सुरुवात केल्यावर अनेकजण मंगलदास मार्केटपासून लांब गेले.

मात्र तरीही इंग्रज शिपायांच्या संरक्षणात मंगलदास मार्केटमध्ये मँचेस्टर कापडाची विक्री सुरूच होती. क्रांतीकारक मंगलदास मार्केटमध्ये शिरून तेथे परदेशी कपड्यांची होळी करणार आहेत, अशी अफवा मुंबईत तेव्हा अनेक दिवस पसरली होती. इंग्रज गेले आणि पुन्हा मंगलदास मार्केट बहारले. इंग्रज माघारी परतल्यानंतर मंगलदास मार्केटमध्ये मुंबईतील गिरण्यांमधील कापड विकले जाऊ लागले. मुंबईतील प्रत्येक मिलचे कापड मंगलदास मार्केटमध्ये हमखास मिळायचे. कॉटनचे तागेच्या तागे या मार्केटमध्ये विकले जायचे. मुंबईतूनच नव्हेतर ठाणे, पुणे आणि आसपासच्या परिसरातून व्यापारी घाऊक कापड खरेदी करण्यासाठी मंगलदास मार्केटमध्ये येऊ लागले. त्यामुळे हे मार्केट गजबजलेले असायचे.

- Advertisement -

आज मंगलदास मार्केटमध्ये शंभरपेक्षा जास्त दुकाने आहेत. ही दुकाने नऊ अरुंद गल्ल्यांमध्ये विभागली गेली आहे. या मार्केटचा इतिहास सांगणारे आता अभावानेच आढळतात. पण म्हणतात ना मार्केट किंवा बाजारला इतिहास नसतो. इथे असतात ते फक्त गिर्‍हाईक आणि माल विकणारे विक्रेते. दोघांचाही संबंध केवळ पैशापुरता. मंगलदास मार्केट त्याचे उत्तम उदाहरण आहे. या मंगलदास मार्केटमध्ये सिल्क, पॉलिस्टर, कॉटन, टेरीकॉटन असा कापड्यांची विक्री होऊ लागली. विवाहाचा बस्ता खरेदीसाठी मंगलदास मार्केट ही दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाची बाजारपेठ झाली. तुम्हाला हव्या त्या डिझाईनचे, हव्या प्रकारचे कापड येथे किफायतशीर भावात मिळते ही या मार्केटची ओळख आहे. पण अतिशय दाटीवाटीने, एकमेकांना खेटून येथील दुकाने असल्यामुळे अनेकवेळा मार्केटमध्ये हलायलाही जागा मिळत नाही. या मार्केटमध्ये पुरुषांसोबतच खरेदीसाठी महिलांची संख्या जास्त असते.

या मार्केटमध्ये दरदिवशी सुमारे १ लाख लोक ये-जा करतात, असे म्हटले जाते. येथील गर्दी बघितली तर त्यात अतिशयोक्ती नक्कीच नाही. या मार्केटमध्ये केवळ कपडे मिळतात. कुठल्याही प्रकारचे रेडीमेट कपडे मार्केटमध्ये उपलब्ध नव्हते. मात्र आता महिलांचे लेगिन आणि कुर्तीही आता मिळू लागले आहेत. हे घाऊक मार्केट असल्यामुळे किरकोळ विक्रीसाठी येथील दुकानदार सहसा तयार नसतात. त्यामुळे कोणी घाऊक खरेदीदार येथे आला असेल तर किरकोळ खरेदीदाराला फारसा भाव मिळत नाही.

या मार्केटमध्ये जाण्यासाठी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंतची वेळ ही सर्वात सोयस्कर आहे. या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना मार्केट फिरता येते, तसेच खरेदीही करता येते. दुपारनंतर मात्र बडे व्यापारी येथे खरेदीसाठी येत असल्यामुळे मार्केट गजबजून जाते. मात्र फक्त फिरण्यासाठी या मार्केटमध्ये जाणार असाल तर जाऊ नका. कारण हे मार्केट अतिशय अरुंद आहे. दुसरे म्हणजे येथील गर्दीमुळे मार्केटमध्ये खूपच हैराण व्हायला होते. तसेच आग लागली तर तेथून सुटका होण्याचे अन्य मार्गही नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये जाण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार केलेला बरा. हे मंगलदास मार्केट दवा बाजारच्या बाजूला आहे. मार्केटमध्ये जायचे असेल तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स स्टेशनवर उतरून मार्केटला जाता येते. तसेच मध्य रेल्वेच्या सीएसटीएम रेल्वेस्थानकावरूनही या मार्केटला जाता येते. पण हा रस्ता लांबचा आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -