घरफिचर्सज्ञानगंगेच्या भगिरथाचा सन्मान!

ज्ञानगंगेच्या भगिरथाचा सन्मान!

Subscribe

५ ऑक्टोबर १९९४ रोजी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे या उद्देशाने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी १९६७ मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी ‘शिक्षकाचा दर्जा’ या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. भारतात मात्र ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.

५ ऑक्टोबर १९९४ रोजी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे या उद्देशाने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी १९६७ मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी ‘शिक्षकाचा दर्जा’ या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. भारतात मात्र ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे जगभरात सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो, पण प्रत्येक देशात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसेच पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांचे महत्त्व विशद करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. जगभरातील १०० देशांमध्ये या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत शिक्षकांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी एक विशिष्ट संकल्पना निश्चित करून त्या आधारे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ह्या वर्षी सुद्धा ‘तरुण शिक्षक – व्यवसायाचं भविष्य’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेद्वारे विविध देशांमधील सरकारांना, त्यांच्या देशातील तरुणांनी व्यवसायाची निवड करताना शिक्षकी पेशाला प्रथम प्राधान्य देतील. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल करण्याचे आवाहन करण्यात येईल. यंदा या दिनानिमित्त शिक्षक संघटना, खासगी क्षेत्रातील नियोक्ते, शाळांचे मुख्याध्यापक, पालक-शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन समित्या, शैक्षणिक अधिकारी आणि शिक्षक प्रशिक्षकांना त्यांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव मांडण्याचे आवाहन करण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, समाजामध्ये ‘सर्वसमावेशक आणि गुणवत्तेच्या’ शिक्षणासाठी अहोरात्र झटणार्‍या शिक्षकांचा सन्मान या दिनानिमित्त करण्यात येतो.
समाज परिवर्तनामध्ये शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. डॉक्टर, लेखक, कलाकार, विचारवंत, अभियंते, शास्त्रज्ञ यांना घडविण्यात शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान असते. आई-वडिलांनंतर शिक्षकच मुलांचे पालक असतात. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर जगण्याची कला आपण शिक्षकांकडून आत्मसात करत असतो. तेव्हा या दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याने आदर व्यक्त करावा. आज भारतात पारंपरिक शिक्षणाऐवजी, कौशल्याधारित शिक्षण राबविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना शिक्षक वर्ग साथ देत आहे. असे असताना आज शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाव्यतिरिक्त इतर सरकारी कामकाजांचा बोजा सर्रासपणे शिक्षकांवर लादण्यात येत आहे. परिणामी अध्यापनाचे कार्य मागे पडत असल्याच्या तक्रारी शिक्षक आज करताना दिसतात. तेव्हा शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त कार्याची जबाबदारी सोपवताना विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे नुकसान होणार नाही, यासाठी सरकारने ठोस उपाय करणे गरजेचे आहे. कमी वेतन, महिनोंमहिने वेतन न होणे, नोकरीची अनिश्चितता, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांमुळे आज तरुण पिढी शिक्षकी पेशाकडे दुर्लक्ष करत आहे. तेव्हा यंदाच्या शिक्षक दिनाच्या संकल्पनेनुसार तरुण शिक्षकांची पिढी घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती असे विविध पैलू पाडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीसुद्धा शिक्षकांप्रती नेहमी आदर बाळगावा. या दिनानिमित्ताने शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचे अभिवादन करुया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -