घरट्रेंडिंगमुंबईचा धनंजय भोसले युट्यूब अॅम्बेसेडर

मुंबईचा धनंजय भोसले युट्यूब अॅम्बेसेडर

Subscribe

युट्यूबवर पैसे कमविण्याची संधी निर्माण झाल्यापासून अनेक तरुण व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकू लागले. यातूनच तयार झाला मुंबईचा युट्यूब अॅम्बेसेडर धनंजय भोसले...

ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंगमध्ये आघाडीची साईट असलेली युट्यूब सर्वांना परिचित आहेच. रोज कोट्यवधी लोक युट्यूबला व्हिजिट करत असल्यामुळे जाहिरातदार युट्यूबकडे वळला आहे. ज्यांच्या व्हिडिओंना लाखोंच्या संख्येने लोक व्हिझिट करतात त्या व्हिडिओंना जाहिराती दिल्या जातात. पैसे कमवण्याची चांगली संधी असल्यामुळे अनेक तरुण क्रिएटिव्ह, माहितीपर व्हिडिओज युट्यूबवर टाकून पैसे मिळवू लागले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर असे अनेक युट्यूबर आहेत. यापैकीच एक आहे मुंबईकर धनंजय भोसले सारखे यंग युट्यूबर…

नाव – धनंजय भोसले
वय – २३
युट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/user/dhananjaybhosale1/
सबस्क्राईबर – २ लाख ३६ हजार २२०
चॅनेलची सुरुवात – ऑगस्ट २०१३
आजपर्यंत मिळालेले एकूण Views – ३४ कोटी ९ लाख ५९ हजार
वेबसाइटhttps://dhananjaytech.com

धनंजय युट्यूबवर मोबाईलचे अनबॉक्सिंग रिव्ह्यूज, मोबाईल टेक टिप्स, टेक फिचर्स याबद्दलचे अपडेट माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या चॅनेलवर पोस्ट करतो. स्वतःच्या आवड आणि छंदाला धनंजयने आता प्रोफेशन बनवले आहे. कॉलेजला असल्यापासून धनंजय युट्यूबचे चॅनेल चालवतोय. सुरुवातील ब्राउजर कसे वापरावे, छोट्या छोट्या कॉम्प्युटर टीप्सपासून सुरुवात करुन नंतर मोबाईल रिव्ह्यूज देण्यास त्याने सुरुवात केली.

- Advertisement -

२०१६ साली युट्यूबने भरवलेल्या NextUp या उपक्रमातंर्गत YouTube Creators मध्ये धनंजयची निवड झाली होती. NextUp मध्ये निवड होण्यासाठी YouTube channel चे सबस्क्राईबर दहा हजारांपेक्षा जास्त आणि एक लाखांपेक्षा कमी असण्याची आवश्यकता असते. भारतामधून काही निवडक युट्यूबरची निवड झाली, धनंजय यापैकी एक होता. धनंजयच्या प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातील युट्यूबकडून जाहीरात प्ले केली जाते. त्यानंतर व्हिडिओच्या मध्यंतरातही एक जाहीरात प्ले होते.

NextUp मध्ये बरेच शिकायला मिळाले, युट्यूब चॅनेलचे वेरिफिकेशनही झाले. युट्यूबवर जाहीराती मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल याची पूर्वतयारी या कार्यक्रमात झाली. – धनंजय

- Advertisement -

सुरुवातीच्या दिवसात धनंजय अगदी जुगाडू पद्धतीने व्हिडिओ बनवायचा. याबद्दल तो सांगतो की, “कॉलेजमध्ये असताना पैसे जवळ नव्हतेच, त्यामुळे मित्रांकडून फोन घ्यायचो आणि व्हिडियो केल्यावर परत करायचो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना थोडे पैसे जमा झाले. तेव्हा कुठे दहा हजाराच्या आसपासचे फोन स्वतःच विकत घ्यायचो. त्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो विकायचो. तो विकल्यानंतर पुन्हा नवीन फोन घ्यायचो.”

सध्या व्हिडिओ मेकिंगसाठी धनंजयकडे व्हिडिओ एडिटर आहे. धनंजयचा भाऊ सुजय हा व्हिडिओ शूटींगची जबाबदारी उचलतो. व्हिडिओ तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल धनंजय सांगतो की, काही व्हिडिओ २-३ तासात तयार होतात तर काही व्हिडिओला दोन-एक आठवडे सुद्धा लागतात. बहुतेक वेळा एका दिवसातच व्हिडिओ पूर्ण करण्याकडे आमच्या टीमचा भर असतो.

धनंजय सध्या इंग्रजी भाषेतच त्याचे चॅनेल चालवत आहे. त्यानंतर आता त्याने ऑक्टोबर २०१७ पासून Tech Marathi या नावाने मराठीतही चॅनेल सुरु केले आहे. ज्याचे सबस्क्राईबर दोन हजार आहेत.

Rohit Adsurhttps://www.mymahanagar.com/author/rohit/
Tech Enthusiast | Geek! | I'm a Geek who spends too much time on Internet & Steam.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -