गुरू पौर्णिमेला बनतोय तीन ग्रहांचा अद्भूत संयोग; ‘या’ ३ राशींना होणार फायदा

हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की, पृथ्वीवर गुरू ईश्वरासमान असतो. या दिवशी आपल्या गुरूची सेवा करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे. तसेच या विशेष दिवशी सूर्य, बुध आणि शुक्र अशा तीन ग्रहांचे अद्भूत संयोग बनत आहेत. गुरू पौर्णिमेला हे तीन ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. मिथुन राशीत या तीन ग्रहांचा प्रवेश अत्यंत शुभ मानलं जातं.

शुभ संयोगाने होणार ‘या’ ३ राशींना होणार फायदा

  • वृषभ
    या शुभ संयोगाने वृषभ राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार असून आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या दरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तसेच अनेक शुभ परिणाम देखील पाहायला मिळतील. तुमचा मान-सन्मान वाढेल.
  • मिथुन
    ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीमध्ये त्रिग्रही संयोग बनत आहे. या योगामुळे या राशीच्या व्यक्तिंना भाग्याची साथ मिळेल. तसेच या काळात काही शुभ संदेश तुम्हाला मिळतील. तसेच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश देखील प्राप्त होईल.
  • धनु
    गुरू पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर धनू राशीच्या लोकांना नवी नोकरी मिळेल. तसेच काही शुभ संदेश सुद्धा मिळतील. तसेच तुमच्या सरकारी नोकरीचे योग सुद्धा बनत आहेत. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

हेही वाचा :Hindu Shastra : देवघरातील ‘या’ ३ गोष्टी मानल्या जातात अशुभ