हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी हा सण साजरा केला जाईल. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते. मात्र, या दिवशी केलेल्या काही चूकांमुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज देखील होई शकतात.
अक्षय्य तृतीयेला करु नका ‘या’ चूका
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका आणि उधार देऊ नये असे केल्याने लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदीसारखे मौल्यवान आणि शुभ धातू खरेदी करणे शुभ मानले जाते. पण या दिवशी प्लास्टिक, अॅल्युमिनियम, काच किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नये. या गोष्टींचा प्रभाव राहुवर होतो, ज्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. तसेच आर्थिक नुकसान होते.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने हरवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे सावध राहा.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ ठेवा. या दिवशी घर अस्वच्छ असल्याच देवी लक्ष्मी नाराज होतात.
- अक्षय्य तृतीयेला मांसाहार, कांदा, लसूण खाऊ नये.
- अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मींच्या पूजेत तुळशीचे पान वापरु नये.
- अक्षय्य तृतीयेला कोणाशीही खोटं बोलू नये.
हेही वाचा :