हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते. तसेच या दिवशी अनेकजण आवर्जून सोने-चांदी खरेदी करतात.
अक्षय्य तृतीया तिथी
अक्षय्य तृतीया 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 वाजता सुरू होईल आणि 23 एप्रिल रोजी सकाळी 07.47 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.
- अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त
22 एप्रिल रोजी सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 पर्यंत असेल. - अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 07.49 ते 23 एप्रिल रोजी सकाळी 7.47 पर्यंत असेल.
अक्षय्य तृतीयेला शुभ योग
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अक्षय्य तृतीयेला 6 उत्तम शुभ योग तयार होणार आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. असं म्हणतात की, या दिवशी सोने-चांदीची खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची वर्षभर कृपादृष्टी राहते, यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
- आयुष्मान योग
21 एप्रिल सकाळी 11 ते 22 एप्रिल सकाळी 9.26 पर्यंत. - सौभाग्य योग
22 एप्रिल सकाळी 9.26 ते 23 एप्रिल सकाळी 8.22 पर्यंत. - त्रिपुष्कर योग
22 एप्रिल सकाळी 5.49 ते 7.49 पर्यंत - सर्वार्थ सिद्धी योग
22 एप्रिल सकाळी 11:24 ते 23 एप्रिल सकाळी 5:48 पर्यंत. - रवि योग
22 एप्रिल सकाळी 11:24 ते 23 एप्रिल सकाळी 5:48 पर्यंत. - अमृत सिद्धी योग
22 एप्रिल सकाळी 11:24 ते 23 एप्रिल सकाळी 5:48 पर्यंत.
हेही वाचा :