Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? हे आहे...

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? हे आहे कारण

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते. तसेच या दिवशी अनेकजण आवर्जून सोने-चांदी खरेदी करतात. आज आम्ही तुम्हाला अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते हे सांगणार आहोत.

हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका देवी यांच्या घरी झाला. भगवान परशुराम हा भगवान विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेला भगवान परशुरामाची पूजा करण्याचाही नियम आहे.

- Advertisement -

तसेच त्रेतायुगाची सुरुवात देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाली होती. या व्यक्तीरुक्त अक्षय्य तृतीयेचा सण आणखी काही कारणांमुळे साजरा केला जातो.

गंगा मातेचा अवतार

- Advertisement -

अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच देवी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. राजा भगीरथने माता गंगा पृथ्वीवर अवतरण्यासाठी हजारो वर्षे तपश्चर्या केली होती. मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेला गंगेत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो.

देवी अन्नपूर्णेचा जन्म

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवसही साजरा केला जातो. देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटींनी वाढते. या दिवशी गरिबांना अन्नदान करण्याचा कायदा आहे आणि या दिवशी लोकांना जेवण दिल्यास घरात अन्नाची कमतरता भासत नाही असा समज आहे.

महाभारत लिहायला सुरुवात

महाभारत हा सनातन धर्मातील पाचवा वेद मानला जातो. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासूनच महाभारत लिहायला सुरुवात केली. श्रीमद भागवत गीतेचा समावेश महाभारतातच करण्यात आला असून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गीतेच्या 18 व्या अध्यायाचे पठण करणे शुभ मानले जाते.


हेही वाचा :

Akshaya Tritiya 2023 : यंदा अक्षय्य तृतीयाला बनणार 6 शुभ योग; जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

- Advertisment -