अक्षय्य तृतीयेला येणारा पंचमहायोग !

gold

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया हिंदू पंचांगानुसार या वर्षी मंगळवार ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतिया साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी लग्न, वास्तू प्रवेश यासारखी अनेक शुभ कार्ये केली जातात. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करताना विशेष मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते कारण आजचा संपूर्ण दिवसच शुभ असतो.

यामुळे अक्षय्य तृतीयेला अनेक जणं घर, वाहन किंवा इतर महत्वाच्या वस्तूंची खरेदी करतात त्याचप्रमाणे आजच्या दिवशी प्रामुख्याने सोन्याची खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि आजच्या दिवशी सोन्याची केलेली खरेदी हि विशेष फलदायी ठरते. किंवा इतर खरेदी केलेल्या वस्तू सुद्धा दीर्घकाळ फलदायी ठरतात आणि त्यांच्यात उत्तरोत्तर वाढ होत जाते.

पण  सध्याच्या वाढत्या महागाई मुळे प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर त्या ऐवजी तुम्ही इत्तर काही गोष्टी खरेदी करू शकता. त्यापैकी एक म्हणजे श्री यंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र हे यंत्र घरी आणून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची पूजा करू शकता त्यांच्याप्रमाणे माता लक्ष्मीला प्रिय असलेला दक्षिणावर्ती शंख घरी आणून त्याचीही पूजा करू शकता. या सर्व गोष्टी घरी आणण्यासाठी अक्षय्य तृतियेचा दिवस हा अत्यंत शुभ मनाला जातो. त्याच प्रमाणे आजच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर या देवतांची मनोभावे केलेली पूजा हि विशेष फलदायी ठरते आणि तुमच्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होते.

आजच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्रहमान सुद्धा शुभ आहे. आजचा दिवस विशेषतः प्रॉपर्टी विकत घेणे आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पंच महायोग तयार होणार आहे. आणि हा अत्यंत मंगल असा योग्य आहे त्यानुसार दरवर्षी ३ मे रोजी सूर्य मेष राशीमध्ये, चंद्र कर्क राशीमध्ये, शुक्र आणि गुरु मीन राशीत तर शनी कुंभ राशीमध्ये असणार आहेत. हा दुर्मिळ योग्य आजच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आलेला आहे. आणि हा दुर्मिळ योग्य १०० वर्षातून एकदा येतो. त्याचप्रमाणे हा दुर्मिळ योग खूप शुभ प्रभाव देणारा आहे. या दिवशी कोणत्याही वस्तूची केलेली खरेदी हि जास्त काळ टिकते आणि विशेष फलदायी ठरते. म्हणून आजच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतंही शुभ काम करणं हे केव्हाही उत्तम.