घरभक्ती'या' दिवशी सुरू होणार अश्विन नवरात्र; जाणून घ्या शुभ मुहूर्त

‘या’ दिवशी सुरू होणार अश्विन नवरात्र; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Subscribe

हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात.

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

- Advertisement -

या दिवशी सुरू होणार नवरात्र
अश्विन नवरात्रीची सुरूवात 26 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 4 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
सोमवार, 26 सप्टेंबर : सकाळी 3:23 पासून ते
मंगळवार, 27 सप्टेंबर : 3:08 पर्यंत असणार आहे.


हेही वाचा : Pitru Paksha 2022 : पितृपक्षात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -