घरसणवारVasant Panchami 2021: म्हणून साजरी करतात वसंत पंचमी; जाणून घ्या शुभ मुहूर्त...

Vasant Panchami 2021: म्हणून साजरी करतात वसंत पंचमी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Subscribe

आज वसंत पंचमीचा सण साजरा होत आहे. आजपासून वसंत ऋतूची सुरूवात होत असून आज देवी सरस्वतीची पूजा केली जाते. उत्तर भारतातील अनेक राज्याच मोठ्या उत्साहात लोक वसंत पंचमी साजरी करतात. या दिवशी लोकं पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालून विद्येची देवता सरस्वतीची पूजा करतात. उत्तर भारतात या दिवसाचे अधिक महत्त्व असून मुलांच्या शैक्षणिक प्रवासाला सुरूवात करण्यासाठी किंवा कोणतीही नवी कला आत्मसाद करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.

पूजा करण्याचा शुभ मुहूर्त

आजच्या वसंत पंचमीच्या दिवशी रवि योग आणि अमृतसिद्धी योगाचे विशेष संयोजन होत आहे. संपूर्ण दिवसभर रवी योगाच्या उपस्थितीमुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ६.५९ ते दुपारी १२.३५ पर्यंत आहे. या मुहूर्तामध्ये उपासना केल्यास अधिक फायदा होईल. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली जातात. पूजेच्या शुभ मुहूर्ताला सुद्धा खूप महत्व आहे. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतिक आहे. त्यामुळे भाविक गंगा तसेच अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पूजा करतील. यावेळी फुलांना बहर येतो, गव्हाची शेती सुद्धा खुलते.

- Advertisement -

अशी करा उपासना

स्नान केल्यावर भाविकांनी पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेने बसावे. तुमच्या समोर पिवळ्या रंगाचे कापड पांघरावे आणि त्यावर माता सरस्वतीची मूर्तीची स्थापना करावी. त्यानंतर केशर, हळद, तांदूळ, पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्य़ा रंगाची मिठाई, साखर, दही, हलवा इत्यादींचा नैवेद्य देवीसमोर ठेवून मनोभावे प्रार्थना करून माता सरस्वतीच्या पायावर श्वेत चंदन लावावे. उजव्या हाताने सरस्वतीच्या पायावर पिवळे आणि पांढरे फुले अर्पण करा आणि ‘ॐ ऐं सरस्वत्यै नमः’ जप करा. शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाल्यास या दिवशी विशेष पूजा केल्यास त्यापासून मुक्ती मिळू शकते.

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -