घरभक्तीBuddha Purnima 2022 : गौतम बुद्धांनी कुटुंबाचा त्याग का केला?

Buddha Purnima 2022 : गौतम बुद्धांनी कुटुंबाचा त्याग का केला?

Subscribe

वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. असं म्हणतात की, या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता आणि याचं दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानाची प्राप्ती झाली होती. भगवान बुद्ध यांचे त्यांच्या लहानपणीचे नाव सिद्धार्थ गौतम होते. गौतम बुद्ध राजा शुद्धोधन यांचे पुत्र होते. मात्र एक दिवस अचानक ते आपली पत्नी, मुल, राजाचे सिंहासन, धन-दौलत सगळं काही सोडून संन्यासी झाले. त्यानंतर कठोर तप करून ज्ञान प्राप्त करून महात्मा बुद्ध बनले. संपूर्ण जगाला त्यांनी आयुष्य जगण्याची शिकवण दिली.

गौतम बुद्धांच्या जन्माची कथा

- Advertisement -

गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी म्हणजेच नेपाल येथे झाला होता. त्यांच्या वडीलांचे नाव राजा शुद्धोदन आणि आईचे नाव माया होते. गौतम बुद्धांच्या जन्मानंतरच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. असं म्हणतात की, एका तपस्वीने राजा शुद्धोदन यांना आधीच सांगितले होते की, सिद्धार्थ गौतम मोठा झाल्यावर एक महान व्यक्ती होईल आणि संपूर्ण जगाचे कल्याण करेल. शुद्धोधन यामुळे चिंतेत पडले. त्यांना वाटले की, सिद्धार्थ जर संन्यासाच्या मार्गाने गेला तर, त्यांची गादी कोण सांभाळणार?

- Advertisement -

त्यामुळे शुद्धोदन यांनी गौतम बुद्धांचा चांगला सांभाळ केला. त्यांना कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा आभास होऊन दिला नाही. त्यांना प्रत्येक प्रकारची सुखसुविधा दिली. त्यांना प्रजेपासून लांब ठेवले, त्यांना कोणत्याही सांसारिक दुःखाचा आभास होऊन दिला नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे लग्न यशोधरा सोबत झाले. राजा शुद्धोधन यांनी गौतम बुद्धांना अनेक आलिशान बंगले भेट म्हणून दिले.कालांतराने गौतम बुद्धांची पत्नी यशोधराने मुलाला जन्म दिला.

काही दिवसानंतर गौतम बुद्ध आपल्या रथामध्ये बसून फिरत असताना, सुरूवातीला त्यांना एक म्हातारा माणूस दिसला. त्यानंतर एक आजारी माणूस दिसला आणि पुढे एक मृत्यू झालेला माणूस दिसला, माणसाच्या आयुष्यातील या सर्व गोष्टी त्यांनी कधीही पाहिल्या नव्हत्या त्यामुळे गौतम बुद्धांचे मन खूप अस्वस्थ झाले. पुढे गेल्यावर गौतम बुद्धांना एक संन्यासी दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाव नव्हते. त्या साधूचे ते तेजस्वी रूप पाहून गौतम बुद्धांचे अस्वस्थ झालेले मन शांत झाले, तेव्हाचं त्यांनी संन्यासी बनायचे ठरवले. गौतम बुद्धांनी वयाच्या २७ व्या वर्षी घर कुटुंबाचा त्याग केला. कठोर तप केले. वयाच्या ३५ व्या वर्षी बोधगया म्हणजेच बिहार येथे त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली.

 


हेही वाचा :‘या’ चार राशींवर चंद्रग्रहण पडणार भारी, तुमची रास कोणती?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -