महाराष्ट्राव्यतिरिक्त भारतातील ‘या’ राज्यात साजरा केला जातो बैलपोळा

या दिवशी शेतकरी आपापल्या बैलाची सजावट करून बैलांची पूजा करतात. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध वस्तुंनी सजवतात. गळ्यात सुंदर घंटा, पायात घुंगरू, शिंगाना रंगवतात.

संपूर्ण वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा आदर करत त्यांच्या बद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी श्रावणातील पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण शुक्रवार, २६ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. बैलपोळा हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी शेतकरी आपापल्या बैलाची सजावट करून बैलांची पूजा करतात. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध वस्तुंनी सजवतात. गळ्यात सुंदर घंटा, पायात घुंगरू, शिंगाना रंगवतात.

काय आहे बैल पोळ्याचे महत्त्व
बैलपोळा सण शेतकरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक पोळा हा सण साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. गावात मिरवणूक झाल्यानंतर घरी महिला बैलांची पूजा करतात. काही ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजी यांसारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

भारतातील या राज्यात साजरा केला जातो बैल पोळा
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा सण साजरा केला जात असून मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये देखील शेतकरी वर्ग हा सण साजरा करतो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते. तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. तर दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते.


हेही वाचा : Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी दिवशी अशी करा गणेश मूर्तीची स्थापना