घरभक्तीChaitra Navratri 2022: चैत्र नवरात्रीत नऊ दिवस करा देवीची आराधना, मिळेल फळ

Chaitra Navratri 2022: चैत्र नवरात्रीत नऊ दिवस करा देवीची आराधना, मिळेल फळ

Subscribe

हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सवाला विशेष महत्व असून वर्षातून दोनदा नवरात्रौत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रौत्सवात देवीच्या नऊ रुपांची भक्त आराधना करतात. देवीच्या या नऊही रुपांना वेगळे महत्व आहे. याचपार्श्वभूमीवर देवीच्या नऊ रुपांबद्दल जाणून घेऊया.

 यावर्षी शुभ मुहूर्त

- Advertisement -

चैत्र नवरात्रि आरंभ- २ एप्रिल

नवरात्री समाप्ती- १० एप्रिल

- Advertisement -

प्रतिपदा तिथी प्रारंभ- १ एप्रिल सकाळी ११ वाजून ५३ मिनिटं

प्रतिपदा तिथी समाप्ती-२ एप्रिल सकाळी ११ वाजून ५८ मिनिट

घटस्थापनेचा मुहूर्त- २ एप्रिल सकाळी ६ वाजून १० मिनिटापासून ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.

देवीचे नऊ रुपं

पहीला दिवस- शैलपुत्री देवी
नवरात्रीच्या पहील्या दिवशी शैलपुत्री देवीची भक्ती पूजा केली जाते. शैलपुत्री ही राजा हिमालय म्हणजे शैल याची कन्या आहे. यामुळे तिला शैलपुत्री संबोधले जाते.

तर दुसरा दिवशी- ब्रम्हचारिणी देवी

ब्रम्हचारिणी म्हणजेच तपाचे आचरण करणारी. ती देवी जिने शंकर भगवानला मिळवण्यासाठी कठोर तप केले होते.

तीसरा दिवस- चंद्रघंटा देवी

देवी चंद्रघंटा म्हणजे ब्रम्हा, विष्णु आणि महेश या तीन शक्तींचे एकत्रित रुप. या देवीच्या मस्तकावर अर्धचंद्र कोरण्यात आलेला असतो. म्हणूनच तिला चंद्रघंटा असे म्हणतात.

चवथा दिवस- कुष्मांडा देवी

नवरात्रीचा चवथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. देवीच्या स्मितहास्यातूनच ब्रम्हांड निर्माण झाल्याने तिला कुष्मांडा नाव पडले आहे.

पाचवा दिवस- स्कंदमाता देवी
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते. स्कंदमाता देवीच्या मांडीवर बाल कार्तिकेय विराजमान असतो. कार्तिकेयचे नाव स्कंद असल्याने देवीला स्कंद माता बोलले जाते.

सहावा दिवस- कात्यायनी देवी

कात्यायन ऋषिंच्या तपावर प्रसन्न होऊन कात्यायनी देवीने त्यांच्या घरी कन्या रुपात जन्म घेतला होता. यावरूनच देवीचे नाव कात्यायनी असे पडले.

सातवा दिवस-कालरात्री देवी
नवरात्रीमध्ये सप्तमीच्या तिथीला देवी कालरात्रीचे पूजन केले जाते. कालरात्रीचे रुप जरी दिसायला भयंकर असले तरी देवी भक्तांचे कल्याण करते. यामुळे कालरात्रीला शुभकारीही म्हटले जाते.

आठवा दिवस-महागौरी देवी

दुर्गा अष्टमीच्या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते. पौराणिक कथेनुसार महागौरीने भगवान शंकर पती म्हणून मिळावे यासाठी कठोर तपस्या केली होती. यामुळे महागौरीचे शरीर काळे पडले होते. शंकराने प्रसन्न होऊन महागौरील गौरवर्ण प्रदान केला होता.

नववा दिवस- सिद्धिरात्री देवी
आपल्या भक्तांना सर्व सिद्धी प्रदान करणारी देवी असल्याने या देवीला सिद्धीरात्री देवी म्हटले जाते.

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -