हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.
यंदा चैत्र नवरात्र 22 मार्च पासून सुरु होणार असून ती 30 मार्चला समाप्त होणार आहे. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्यामुळे या पवित्र दिवसांमध्ये अनेक नियमांचे पालन करायला हवे.
नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका ‘या’ चूका
- घर बंद ठेऊ नका
नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर, या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेऊ नका. घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं. तसेच या काळात दिवसाचे झोपू नका. - मुलींना ठेवा खूश
हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते. या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका. शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात. फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व
स्त्रियांचा आदर करावा. - वादविवादापासून दूर राहा
नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये. नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही. - कांदा, लसूण आणि मासांहार करू नये
नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मासांहार करू नये. नवरात्रीत यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते. - केस आणि नखे कापू नये.
नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये. कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते.