Chaitra Navratri 2023: केव्हा आहे चैत्र नवरात्र? पूजाविधी आणि कलश स्थापनेचे महत्व

सण उत्सवात या शक्तीची उपासना केली जाते. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते.

हिंदू धर्मामध्ये स्त्री शक्तीला विशेष महत्व आहे. सण उत्सवात या शक्तीची उपासना केली जाते. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. वर्षाच्या सुरुवातीला येणारी पहीली वासंतिक नवरात्र ही चैत्र महिन्यात येते. (Chaitra Navratri) तर दुसरी नवरात्र आषाढ महिन्यात, अश्विन महिन्यात तिसरी शारदीय नवरात्र आणि माघ महिन्यात येते ती चौथी नवरात्र. यावर्षी चैत्र नवरात्र २२ मार्चपासून सुरू होत असून ३० मार्चला समाप्त होणार आहे

नवरात्रीच्या पहील्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते अशी यामागची धारणा आहे. दुर्गादेवी ही सुख, समृद्धी आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते. जे भाविक श्रद्धेने देवीची पूजा करतात त्यांवर देवीची अखंड कृपा असते अशी भाविकांची भावना श्रद्धा आहे.

यावर्षी २२ मार्च २०२३ बुधवार रोजी चैत्र नवरात्रीला आरंभ होत आहे. विशेष म्हणजे यावेळी चैत्र नवरात्रीला ग्रह आणि नक्षत्रांचा अनोखा संयोग जुळून आला आहे. ज्याचा परिणाम शनि मंगळ युतीबरोबरच सर्वाध सिद्दी योगावर होणार आहे.

चैत्र नवरात्रि घटस्थापना मुहूर्त –

सकाळी ६ वाजून २३ मिनटांपासून सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असेल.

प्रतिपदा तिथी प्रारंभ- मार्च २१, २०२३ रोजी रात्री १० वाजून ५२ मिनिटांपासून सुरू होईल.

प्रतिपदा तिथी समाप्त –  मार्च २२, २०२३ ला रात्री ८ वाजून २० मिनटांनी समाप्त होणार आहे.

नऊ दिवस होणार देवीच्या या रुपांची पूजा

१- नवरात्री पहीला दिवस २२ मार्च २०२३ बुधवार: देवी शैलपुत्री

२ नवरात्री दूसरा दिवस २३ मार्च २०२३ गुरुवार… देवी ब्रम्हचारिणी

३.नवरात्री तिसरा दिवस २४ मार्च २०२३ शुक्रवार: देवी चंद्रघंटा पूजा

४- नवरात्री चौथा दिवस २५ मार्च २०२३ शनिवार: देवी कुष्मांडा पूजा

५ नवरात्री पाचवा दिवस २६ मार्च २०२३ रविवार: देवी स्कंदमाता पूजा

६ नवरात्री सहावा दिवस २७ मार्च २०२३ सोमवार: देवी कात्यायनी पूजा

७. नवरात्री सातवा दिवस २८ मार्च २०२३ मंगळवार: देवी कालरात्रि पूजा