Chanakya Niti- आयुष्यात यशस्वी होण्याचे ‘१०’ मंत्र

भारतातील काही निवडक विद्वान व्यक्तींमध्ये चाणक्य यांचे नाव आवर्जून घेतले जाते. चाणक्य यांना राजकारणाबरोबर , कूटनीति शास्त्र,अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान प्राप्त होते. यामुळे आज २१ व्या शतकातही चाणक्य यांच्या नीतिचे धडे गिरवण्याचे सल्ले दिले जातात. चाणक्य यांच्या अनेक यश देणाऱ्या मंत्रांपैकी दहा मंत्रांना विशेष महत्व आहे. कारण हे मंत्र आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहेत. जे कार्यसफलता निश्चित मिळवून देतात.

शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहा-चाणक्य सांगतात की अशा व्यक्तीपासून नेहमी सावध राहावे जो शस्त्र बाळगतो. कारण अशा व्यक्ती रागात केव्हाही शस्त्राचा वापर करू शकतात. यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना नाहक त्रास होऊ शकतो.

अंहका्र- चाणक्य नितीमध्ये अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगण्यात आले आहे. अहंकारी व्यक्तीला समाजात सन्मान मिळत नाही. जवळच्या व्यक्तीही लांब जातात. त्यामुळे चांगले दिवस आल्यावर अहंकारी होऊ नये. कारण कोणाचे दिवस केव्हा बदलतील सांगता येत नाही.

राग-क्रोध, – राग-क्रोध हे देखील माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. रागात माणसे तोंडाला येईल ते बोलतात. त्यामुळे त्याक्षणाला त्यांना चांगल्या वाईटाचा विसर पडतो. यामुळे त्याच्या प्रतिमेसही धक्का बसतो.

विचार- चाणक्य निती सांगते की विचारपूर्वक केलेल्या कार्यात कधीही पश्चातापाची वेळ येत नाही. यामुळे कुठलेही काम हाती घेताना विचार करून घ्यावे. नाहीतर मनस्तापाला सामोरे जावे लागते.

लोभ – चाणक्य निती सांगते की माणसाने कुठल्याही गोष्टीचा कधीही लोभ करू नये. कारण लोभी व्यक्तींना कधीच समाधान मिळत नाही.

शिस्त-कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त असणे गरजेचे आहे. कारण शिस्तीत जगणारी व्यक्तीच दुसऱ्याला शिस्त लावू शकते. शिस्तीत केलेल्या कामांना यश मिळते.

आळस- चाणक्य सांगतात की आळशी व्यक्ती या कामचुकार असतात. जबाबदाऱ्या स्विकारण्यापेक्षा त्या टाळण्यात अशा व्यक्ती हुशार असतात. स्वता:च्या कामासाठी अशा व्यक्ती हिरिरिने पुढाकार घेतात. पण दुसऱ्याच्या बाबतीत मात्र काहीच कळत नाही असा आव आणत वेळ मारून नेतात. यामुळे लोक अशा व्यक्तींना आदर मिळत नाही.

खोटं बोलणं- यु्द्धात आणि प्रेमात खोटं बोलण्यास माफी असते असे म्हटले जाते. पण खोटं बोलण्यामुळे नेहमीच फायदा होईल असे नाही तर अनेकवेळा व्यक्ती खोट्याचे खरे करण्यात समोरच्या व्यक्तीचा विश्वास कायमचा गमावते.

कष्ट- चाणक्य नितीनुसार जी व्यक्ती कष्टाला घाबरत नाही. वाटेल तेव्हा मिळेल ते काम करण्यास तयार असते तिला हमखास यश मिळते.

फसवणूक- चाणक्य सांगतात कधीही कोणाची फसवणूक करू नये. अनेक वाईट सवयींपैकी फसवणूक ही देखील एक सवय असते. दुसऱ्यांना फसवणाऱ्या व्यक्तीही कधीतरी फसू शकते.