घरभक्तीदिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उपाय; चमकेल तुमचे भाग्य

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; चमकेल तुमचे भाग्य

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो.या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते. असं म्हणतात की, दिवाळीच्याच दिवशी श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते. त्यामुळे अयोध्येतल्या नागरिकांनी आनंद साजरा केला होतो. मात्र या दिवशी अश्विन अमावस्या असल्याने रात्री सगळीकडे अंधार होता. त्यामुळे अयोध्येतल्या लोकांनी मातीचे दिवे लावून सर्व अयोध्या प्रकाशमय करत श्रीरामांचे स्वागत केले. तेव्हापासून हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.

- Advertisement -

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

- Advertisement -

देवी लक्ष्मीला श्री यंत्र अत्यंत प्रिय आहे. दिवाळीच्या दिवशी घरी श्रीयंत्र घेऊन आणि त्याची विधीवत पूजा करा. त्यावर पंचामृत आणि गंगाजलाचा अभिषेक करा. गुलाबाचे अत्तर लावून गुलाबाच्या फुलांनी सजवा. त्यासमोर तूपाचा दिवा लावून देवी लक्ष्मींच्या मंत्राचे किंवा स्तोत्रांचे पठण करा.

देवी लक्ष्मीला कमळ गट्ट्याची माळ अत्यंत प्रिय आहे. त्या माळेने देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्याने तो लवकर फलदायी ठरतो. दिवाळीच्या दिवशी तुमच्या पूजेमध्ये या माळेचा उपयोग नक्की करा.

दिवाळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा आणि संध्याकाळी घरामध्ये सुवासीक फुलं किंवा रुम फ्रेशरनर यांचा वापर करुन घर सुंगधी करा. असं म्हणतात की, लक्ष्मी पूजनावेळी देवी लक्ष्मी आपल्या घरी येतात, त्यांच्या स्वागतासाठी घर स्वच्छ आणि सुवासिक असायला हवे.

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनादरम्यान पांढरी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करा.

 

दिवाळीच्या दिवशी घरातील अन्न वाया घालवू नका, उरलेले अन्न गरजू व्यक्तिला दान करा.

दिवाळीच्या दिवशी गाय आणि कुत्रा यांना देखील गोड पोळी खाऊ घाला.

 


हेही वाचा :

यंदाच्या दिवाळीत ‘या’ 4 राशींवर होणार शनी देवाची कृपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -