Saturday, April 20, 2024
घरमानिनीReligiousMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

Subscribe

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. 2024 मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जात आहे. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं.

ज्योतिष शास्त्रानुसार, मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. पौराणिक कथांनुसार, मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य देव त्यांचे पुत्र शनी देवांच्या घरी जातात. शनि मकर आणि कुंभ राशींचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवशी पिता-पुत्राची भेट होते. शास्त्रानुसार या दिवशी काही काम करण्यास वर्ज्य मानले जाते. कारण ते काम केल्यास सूर्य देव तुमच्या नाराज होऊ शकतात.

- Advertisement -

मकर संक्रांत शुभ मुहूर्त

यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी सकाळी 08 : 30 वाजता सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतचा पुण्यकाळ मुहूर्त 15 जानेवारी सकाळी 06 : 50 पासून संध्याकाळ 05: 34 पर्यंत असेल. तर महापुण्यकाळ सकाळी 06 : 50 पासून सकाळी 08 : 38 पर्यंत असेल. पुण्यकाळ आणि महापुण्यकाळामध्ये स्नान-दान करणं शुभ मानले जाते.

मकर संक्रांतीला करु नका ‘या’ गोष्टी

Keeping Your Cool: Empowering Strategies for Managing Anger

- Advertisement -

 

  • मकर संक्रातीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते.
  • मकर संक्रातीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करु नये. या दिवशी केवळ सात्विक आहार घ्यावा.
  • मकर संक्रातीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गरजू, वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. यामुळे शनी देव तुमच्यावर क्रोधीत होतील.
  • या दिवशी घरामध्ये कलह करु नये.
  • मकर संक्रातीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करु नये.
  • या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. त्याचा अपमान करु नये.

हेही वाचा :

Makar Sankranti 2024 : संक्रांतीला पतंग का उडवला जातो? जाणून घ्या फायदे

- Advertisment -

Manini