घरभक्तीरक्षाबंधन विशेष : भावासाठी चुकूनही घेऊ नका अशी राखी, का? ते वाचा

रक्षाबंधन विशेष : भावासाठी चुकूनही घेऊ नका अशी राखी, का? ते वाचा

Subscribe

रक्षाबंधनाची वेळ ११ ऑगस्ट रोजी गुरूवारी सकाळी १०.३८ पासून सुरू ते १२ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी ७.०५ पर्यंत असेल

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे, कारण या दिवशी रवि योग सुद्धा असणार आहे.

रक्षाबंधन तिथी
प्रत्येक वर्षी रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतात. रक्षाबंधनाची वेळ ११ ऑगस्ट रोजी गुरूवारी सकाळी १०.३८ पासून सुरू ते १२ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी ७.०५ पर्यंत असेल.

- Advertisement -

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधणे लाभकारी मानले जाते.

- Advertisement -
  • अभिजीत मुहूर्त- त्यामुळे यावेळी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ९ वाजून २८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत असेल.
  • रवि योग- या दिवशी सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत रवि योग असेल.
  • अमृत योग- संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तांवर बांधलेली राखी अत्यंत शुभ मानले जाते

रक्षाबंधनला भावासाठी चुकूनही घेऊ नका अशी राखी

  • रक्षाबंधन सुरू होण्याआधी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. मात्र भावासाठी राखी घेताना विशेष काळजी घ्या.
  • राखी विकत घेताना कधीही काळ्या किंवा निळ्या रंगाची राखी घेऊ नका, कारण यामुळे खूप नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.
  • तसेच राखी कधीही खूप मोठ्या आकाराची सुद्धा घेऊ नये.कारण ही कधीही तुटू शकते, जे अशुभ समजले जाते.
  • राखी विकत घेताना राखीचा रंग, लाल, केशरी, पिवळा, पांढरा, गुलाबी , हिरवा अशा रंगाची असावी.तसेच ती लहान आकाराची आणि आकर्षक असावी.
  • तसेच राखीवर स्वास्तिक, ओम अशी चिन्ह असणं देखील शुभ मानलं जातं.
  • तुम्ही तुमच्या भावाला चांदीची राखी सुद्धा बांधू शकता.

हेही वाचा : रक्षाबंधन 2022 : रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या शुभमुहूर्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -