घरदीपोत्सवDiwali 2020: यंदाची दिवाळी करा अधिक गोड; घरीच बनवा 'या' Sweet Recipes

Diwali 2020: यंदाची दिवाळी करा अधिक गोड; घरीच बनवा ‘या’ Sweet Recipes

Subscribe

यावर्षी दिवाळीत बाहेरून मिठाई विकत न आणता घरच्या घरीच खमंग गोड पदार्थ तयार करून यावर्षीची दिवाळी करा अधिक गोड..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी सुरक्षित साजरा करूया आणि आपल्यासह इतरांचीही काळजी घेऊया… यावर्षी दिवाळीत बाहेरून मिठाई विकत न आणता घरच्या घरीच खमंग गोड पदार्थ तयार करून यावर्षीची दिवाळी करा अधिक गोड..

मावा करंजी रेसिपी

- Advertisement -

सामग्री 

मैदा – एक कप , तूप – एक कप, कोमट पाणी – १/४ ग्लास , पिठी साखर – एक कप, भाजलेला मावा – एक कप, बारीक किसलेले सुके खोबरे – एक कप , पिस्ता आणि बदामाचे काप, रवा – अर्धा कप, चारोळी – एक चमचा, केशर आणि चिमूटभर वेलची पावडर

- Advertisement -

पाककृती 

  • पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धा कप रवा भाजून घ्या. यानंतर एक कप बारीक किसलेले सुके खोबरे, चारोळी, बदाम- पिस्त्याचे काप, वेलची पूड आणि केशर मिक्स करा.
  • दुसऱ्या बाउलमध्ये एक कप मैदा घ्या, त्यात अर्धा कप तूप मिक्स करा. तूप आणि मैदा नीट मिक्स करून घ्या. आता पिठामध्ये थोडं-थोडं कोमट पाणी ओता.
  • करंजीसाठी पीठ मळा. पीठ मळून झाल्यानंतर ते स्वच्छ कापडाने थोड्या वेळासाठी झाकून ठेवा.
  • पॅनमधील मिश्रण थंड झाल्यावर त्यात एक कप पिठी साखर, एक कप भाजलेला मावा मिक्स करावा. तयार झाले करंजीचे सारण.
  • लाटलेली पुरी करंजी मेकरमध्ये ठेवून त्यात सारण भरा. तुपात करंज्या फ्राय करून घ्या.

​स्वादिष्ट काजू हलवा

सामग्री

काजू – एक कप, गव्हाचे पीठ – अर्धा कप, साखर – एक कप, तूप – अर्धा कप, वेलची पावडर – १/४ चमचा, केशर – तीन ते चार काड्या, बदाम – ५ ते ६ , पाणी – तीन कप

पाककृती 

  • मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू वाटून त्यांची बारीक पूड तयार करा. यानंतर पॅनमध्ये तीन कप पाणी उकळत ठेवा. उकळत्या पाण्यामध्ये एक कप साखर मिक्स करून पाक तयार करावा.
  • साखरेच्या पाकात ३-४ के
  • शरच्या काड्या घालाव्यात. मिश्रण थोडा वेळ उकळू द्यावं.
  • दुसऱ्या पॅनमध्ये अर्धा कप तूप गरम करा. तुपात अर्धा कप गव्हाचं पीठ परतवून घ्या.
  • यानंतर पॅनमध्ये काजूची पावडर घालावी. पाच ते सहा मिनिटे मिश्रण ढवळावे.
  • मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात साखरेचा पाक मिक्स करा. हलवा शिजेपर्यंत सर्व सामग्री नीट ढवळत राहा.
  • हलवा तयार झाल्यानंतर वरून वेलची पूड आणि बदामाचे काप घालावेत. यानंतर हलवा पुन्हा एकदा नीट मिक्स करावा.

​यम्मी! बालूशाही

सामग्री

मैदा – दोन कप , साखर – दोन कप , पाणी – एक कप, दही – १/४ कप , तेल – १/४ कप , साखरेच्या पाकासाठी १/४ कप पाणी, वितळवलेलं तूप – १/४ कप, चिमूटभर सोडा, गार्निशिंगसाठी ३-४ लहान वेलदोडे आणि बदामाचे काप

पाककृती 

  • एका बाउलमध्ये १/४ कप पाणी, वितळवलेलं तूप, चिमूटभर खायचा सोडा एकत्र घ्या.
  • सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर बाउलमध्ये दोन कप मैदा मिक्स करा.
  • आता यामध्ये दह्याचा समावेश करा. पुन्हा थोडासा मैदा मिक्स करून पीठ मळून घ्या आणि २० मिनिटांसाठी पीठ सेट होण्यास ठेवून द्या.
  • दुसऱ्या पॅनमध्ये दोन कप साखर घ्या आणि त्यात १/४ कप पाणी मिक्स करून साखरेचा पाक तयार करावा. बालूशाही करण्यापूर्वी पीठ पुन्हा मळा.
  • पिठाचे लहान- लहान आकाराचे गोळे तयार करा. पिठाला डोनटप्रमाणे आकार द्यावा.
  • गरम तेलामध्ये बालूशाही फ्राय करून घ्या. यानंतर बालूशाही साखरेच्या पाकात बुडवून ठेवा.

साखर- खोबऱ्याची पोळी

सामग्री 

मैदा – अर्धा कप, चिरोट्याचा रवा – दोन चमचा, तेल – अर्धा कप, तूप – अर्धा कप, पाणी – एक कप, चिमूटभर वेलची पूड, पिठी साखर – एक कप, किसलेले सुके खोबरे – एक कप

पाककृती 

  • बाउलमध्ये मैदा, चिरोट्याचा रवा, थोडेसं मीठ एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा. यामध्ये थोडंसं तेल घालून मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव करावं.
  • आता बाउलमध्ये थोडे-थोडे पाणी ओता आणि पीठ मळा. पीठ सेट होण्यास दोन ते तीन तास एका बाजूला ठेवावे.
  • दुसऱ्या बाउलमध्ये सारण तयार करून घ्या. यासाठी बारीक किसलेले सुके खोबरे, पिठी साखर, चिमूटभर वेलची पूड एकत्र मिक्स करा.
  • मिश्रणात आवश्यकतेनुसार तूप घाला. सारणाचे लहान लाडू वळून ठेवा.
  • पीठ पुन्हा मळा आणि यानंतर हातानंच पिठाला पुरीसारखा आकार द्या.
  • पिठात मोदकाप्रमाणे सारण भरा. हलक्या हाताने पोळी लाटून घ्या.
    लाटलेली पोळी दोन्ही बाजूनं पॅनमध्ये शेकवा.
  • साखर-खोबऱ्याची पोळी तयार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -