Wednesday, April 17, 2024
घरमानिनीReligiousMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'या' नियमांचे पालन

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी करा ‘या’ नियमांचे पालन

Subscribe

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. 2024 मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाईल. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचे देखील विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी शास्त्रात काही नियम सांगितले जातात. त्यांचे पालन केले जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी करा ‘या’ नियमांचे पालन

Makar Sankranti, Pongal: Is Makar Sankranti 2024 On January 14 Or 15? Know The Correct Date

- Advertisement -

 

  • मकर संक्रांतीच्या दिवशी पुजा करण्यासाठी शुभमुहुर्त सूर्योदय पासून सूर्यास्त पर्यंत असणार आहे. या दिवशी देवीने काळे वस्त्र धारण केले असून हातात भाला घेतला आहे. त्यामुळे या दिवशी काळा रंग वापरू नये.
  • या वर्षी संक्रांती वृद्धावस्थेत असून त्यामुळे ही संक्रांत वृद्ध व्यक्तींवर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दिवशी घरातील वृद्धांची जास्त काळजी घ्यावी. या दिवशी त्यांच्यावर रागवू नये आणि त्यांचा अपमान करू नये.
  • यंदा देवी संक्रांतीचे मुख्य वाहन घोडा असून त्यासोबतच उपवाहन सिंह देखील आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. तसेच, तिची दक्षिण-पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी जेवायला बसताना किंवा झोपताना दक्षिण-पश्चिम दिशेकडे पाय किंवा तोंड करून नये.
  • संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील घराची दिशा असणाऱ्या लोकांना सुख प्राप्त होते संक्रांति काळात स्नान , दानधर्म, नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते .
  • संक्रांती पर्व काळात स्त्रीयांनी दान करावे ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी.
  • तसेच या दिवशी घरात शाकाहारी अन्न बनवावे आणि खावे.

हेही वाचा :

Makar Sankranti 2024 : यंदा संक्रांतीला काळा रंग वर्ज्य; ‘या’ रंगाचे घाला कपडे

- Advertisment -

Manini