घरगणेशोत्सव 2022Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला का करू नये चंद्रदर्शन? बाप्पाने का...

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला का करू नये चंद्रदर्शन? बाप्पाने का दिला होता चंद्राला शाप?

Subscribe

या दिवशी चंद्राचे दर्शन केल्यास किंवा चंद्राकडे पाहिल्यास अकारण दोष, कलंकचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी जो व्यक्ति चंद्र दर्शन करतो त्या व्यक्तिवर चोरीचा खोटा आरोप लागू शकतो.

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पूजेचे तसेच अनेक गोष्टीचे महत्व सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करणे वर्ज केले जाते. असं म्हणतात की, या दिवशी चंद्राचे दर्शन केल्यास किंवा चंद्राकडे पाहिल्यास अकारण दोष, कलंकचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी जो व्यक्ति चंद्र दर्शन करतो त्या व्यक्तिवर चोरीचा खोटा आरोप लागू शकतो.

- Advertisement -

गणेश चतुर्थीला का करू नये चंद्रदर्शन
पौराणिक कथेनुसार, जेव्हा देवा पार्वतीच्या आदेशावरून गणपती बाप्पा घराच्या मुख्य द्वाराबाहेर पहारा देत होते, त्यावेळी महादेव तेथे आले. गणपतीने त्यांना घरामध्ये जाण्यास नकार दिला. तेव्हा महादेवांनी रागात गणपतीचे शिर धडापासून वेगळे केले. ही गोष्ट माता पार्वतीला कळताच त्यांनी आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. त्यावेळी महादेवांनी हत्तीचे शिर गणपतीला प्रदान केले. तेव्हापासून बाप्पाला गजानन देखील म्हटले जाते. बाप्पाचे हे मोहक रूप पाहून त्याक्षणी सर्व ब्रह्मांडातले देवी-देवता त्यांना आर्शिवाद देत होते, परंतु चंद्र देव गणपतीच्या रूपावर कुत्सिक पणे हासत होते, त्यावेळी बाप्पाने चंद्राला शाप दिला. की जो व्यक्ति गणेश चतुर्थाच्या दिवशी तुझे दर्शन घेईल, त्या व्यक्तिवर चोरीचा खोटा आरोप लागेल.

गणेश चतुर्थीला चुकून चंद्र दर्शन झालं तर करा ‘हे’ काम
गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही चुकून चंद्रदर्शन केले तर अशावेळी तुम्ही तत्काळ बाप्पाची माफी मागा आणि त्यांच्या स्तोत्रांचे पठण करा.


हेही वाचा : Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाच्या पूजेमध्ये चुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचा वापर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -