Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर सणवार गणपती स्पेशल 'मोदक' रेसिपी

गणपती स्पेशल ‘मोदक’ रेसिपी

Related Story

- Advertisement -

गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. यामुळे गणपतीच्या दिवसांमध्ये घरोघरी बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवले जातात. यात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक महिला आवर्जुन बनवतात. अशाच काही मोदकांची रेसिपी आम्ही सांगणार आहोत.

उकडीचे मोदक

- Advertisement -

साहीत्य-2 वाट्या एका नारळाचा चव ( सारण, पावडक, किस), दीड वाटी बारीक चिरलेला गूळ,1 चमचा वेलचीपूड,2 वाट्या पाणी, 2 वाट्या तांदळाचं पीठ,१ चमचा तूप,

कृती- सर्वप्रथम मंद गॅसवर कढईत नारळ, गूळ आणि वेलची पूड एकत्रपणे भाजून घ्या. नारळ कोरडे व्हायला लागले की गॅस बंद करा. दुसरीकडे गॅसवर एका पातेल्यात दोन वाट्या पाणी घालून त्यात एक चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ घाला. पाण्याला उकळी आली की त्यात दोन वाट्या तांदूळ पीठ घालून चांगले ढवळून घ्या. पातेल्यावर झाकण ठेवा. वाफ येऊ द्या. पीठ कोमट झाल्यावर चांगले मळून घ्या.

- Advertisement -

पीठाच्या गोळ्याची वाटी सारख्या आकाराची पारी करा. त्यात नारळाचे सारण भरा. त्याला मोदकाचा आकार देत सगळ्या बाजूंनी बंद करा. नंतर मोदकाच्या साच्याला आतून तूप लावा. त्यात हे मोदक भरा. हलक्या हाताने साचा दाबा. सुंदर आणि सुबक असे मोदक तयार .

नारळाचे इन्स्ंटट मोदक

साहीत्य- दोन वाटी नारळाचा चव, पाव वाटी तूप, (मिल्कमेड) कंडेस्ड मिल्क अंदाजानुसार, २ चमचे वेलची पावडर, २ चमचे चारोळी,२ चमचे बदाम-काजूचे बारीक काप, खाण्याचा रंग

कृती-सर्वात आधी गॅसवर मंद आचेवर एक मध्यम आकाराची कढई ठेवा. कढई गरम झाली की त्यात तूप टाका. त्यानंतर त्यात नारळाचा चव टाकून मध्यम लालसर होईपर्यंत १० सेकंद भाजून घ्या. नंतर त्यात बाजारत मिळणारे कंडेस्ड मिल्क ओता. रंग टाका. मिश्रण सतत ढवळत राहा. त्यात वेलची पावडर, बदाम ,काजूचे काप, चारोळी टाका. मिश्रण थंड होऊ द्या. थंड झालेले मिश्रण मोदकाच्या साच्यात भरा. झटपट मोदक तयार.

तळणीचे मोदक

सारण( पंचखाद्य)

साहित्य- १ वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ, अर्धा चमचा जायफळ पूड, ४ बदाम आणि ५ काजूचे बारीक तुकडे, १०-१२ बेदाणे, चारोळी, एक दोन केशराच्या काड्या

कृती- सगळं साहित्य कढईत घ्या. १ चमचा तूप घालून परतून घ्या. मंद आचेवर दहा मिनिटं ठेवा.

मोदकाचे आवरण

साहित्य- २ वाटी गव्हाचे कणीक, १ चमचा रवा, २ चमचे तुपाचं मोहन, अंदाजानुसार मीठ, साखर, दूध

कृती- गव्हाच्या पीठात रवा, तुपाचं मोहन, मीठ, साखर, दूध टाका. नंतर हे मिश्रण एकत्र करू कणीक मळून घ्या. कणीक पातळ पुरी सारखी लाटून त्यात सारण भरा. कडांना हाताने कळ्या पाडा. मोदकाचा आकार द्या. कढईत तूप गरम करून त्यात मोदक तळा.

रव्याचे मोदक
साहीत्य-अर्धा कप रवा, एक चमचा तूप, पाव कप साखर, 2 चमचे मिल्क पावडर, एक चमचा वेलची इसेन्स, पाव चमचा खाण्याचा रंग.

कृती-गॅसवर मंद आचेवर कढईत तूप गरम करा. नंतर त्यात रवा खरपूस भाजा. रवा लालसर झाला, त्याचा सुंगध येऊ लागला की त्यात दुप्पट पाणी घाला.रवा शिजवून घ्या. नंतर त्यात मिल्क पावडर,साखर, वेलची टाकून मिश्रण एकत्र करून घ्या. गॅस बंद करुन मिश्रणात खाण्याचा रंग टाका. मिश्रण मोदकाच्या साच्यात भरा. हलक्या हाताने दाब द्या. झटपट रवा मोदक तयार

 

- Advertisement -