Eco friendly bappa Competition
घर भक्ती Chaitra Navratri 2023 : यंदा पडणार भरपूर पाऊस कारण, नवरात्रीत 'या' वाहनावरून...

Chaitra Navratri 2023 : यंदा पडणार भरपूर पाऊस कारण, नवरात्रीत ‘या’ वाहनावरून येणार देवी दुर्गा!

Subscribe

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

यंदा चैत्र नवरात्र 22 मार्च पासून सुरु होणार असून ती 30 मार्चला समाप्त होणार आहे. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

- Advertisement -

Goddess Durga - Facts, Meaning, Iconography, Symbolism - Know More

पौराणिक मान्यतेनुसार, वाघ किंवा सिंहाला देवीचे वाहन मानले जाते. अनेक फोटो आणि मूर्तीमध्ये वाघ किंवा सिंहाला आपण देवीचे वाहन म्हणून पाहते. परंतु नवरात्रीच्या काळात जेव्हा देवीचे आगमन होते त्यावेळी देवीचे वाहन बदलते असं म्हटलं जातं. देवी भागवत ग्रंथानुसार, नवरात्रीत देवी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते.

वारानुसार निश्चित केले जाते देवीचे वाहन

- Advertisement -

Navratri Ashtami 2018 | Celebrate ritualistically the day of manifestation of Maa Durga - The Statesman

 

देवी कोणत्या वाहनावरुन येणार आहे हे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या वारानुसार निश्चित केले जाते. ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस रविवारी किंवा सोमवारी येतो त्यावेळी देवी हत्तीवर बसून येते. ज्यावेळी नवरात्र मंगळवारी किंवा शनिवारी येते त्यावेळी देवी घोड्यावरुन येते असं समजलं जातं. तसेच ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवार किंवा शुक्रवारी असतो त्यावेळी देवी डोलीमध्ये बसून येते. बुधवारी आलेल्या नवरात्रीत देवी बोटीवर बसून येते. नवरात्रीमध्ये देवी कोणत्या वाहनावर बसून येते यामुळे येणारे वर्ष शुभ असेल की अशुभ याचा अनुमान लावला जातो. यंदा चैत्र नवरात्रीचा पहिल्या दिवशी बुधवार असल्याने देवी बोटीवर बसून येणार आहे. त्यामुळे यंदा खूप पाऊस पडणार असल्याचा संकेत यातून मिळतो.


हेही वाचा :

Chaitra Navratri 2023: नवरात्रीच्या पवित्र दिवसात चुकूनही करू नका ‘या’ चूका

- Advertisment -