घरभक्तीGudipadwa 2023 : जाणून घ्या गुढीपाडव्याबाबत प्रचलित समजुती आणि पौराणिक कथा

Gudipadwa 2023 : जाणून घ्या गुढीपाडव्याबाबत प्रचलित समजुती आणि पौराणिक कथा

Subscribe

गुढीपाडवा या सणापासून हिंदू नव वर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा 22 मार्च 2023 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक मराठमोळी वेषभुषा, दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत, गोडाधोडाचा स्वयंपाक करत नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मुंबईसह राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला जातो.

गुढीपाडवा शुभ मुहूर्त

यंदा 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरु होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 8:20 वाजता समाप्त होईल. तसेच गुढीच्या पूजेसाठी सकाळी 6:29 ते 7.39 पर्यंतची वेळ शुभ असेल.

- Advertisement -

गुढीपाडव्याची पौराणिक कथा

Itiha Gudi शोपीस आर्टिफिशियल अपटर्न कॉपर वेसल के साथ, ऑरेंज (नारंगी) साड़ी, लीफ के साथ वुडन बेस गुड़ी पड़वा/रिटर्न गिफ्ट/हाउस वार्मिंग गिफ्ट (22 cm ...

गुढीपाडव्या संबंधित असलेल्या पौराणिक कथेनुसार, राजा बळी त्रेतायुगात दक्षिण भारतावर राज्य करत होता. जेव्हा प्रभू राम सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात होते. त्यानंतर दक्षिणेत त्यांची भेट बळीचा भाऊ सुग्रीवाशी झाली. सुग्रीवाने भगवान रामाला बळीच्या कुशासन आणि दहशतीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर प्रभू रामाने बळीचा वध करून सुग्रीवाला त्याच्या दहशतीतून मुक्त केले. असे म्हणतात की, ज्या दिवशी प्रभू रामाने बळीचा वध केला, तो दिवस चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा होता. म्हणूनच दरवर्षी हा दिवस दक्षिणेला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजयाची पताका फडकवली जाते.

- Advertisement -

गुढीपाडव्याबाबत इतर देखील अनेक समजुती आहेत

  • असं म्हणतात की, चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला महत्त्व आहे.
  • गुढीपाडव्याच्या दिवशी जगात पहिल्यांदा सूर्य उगवला असे मानले जाते. म्हणूनच शास्त्रात गुढीपाडवा हा जगातील पहिला दिवस मानला जातो.
  • या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा पराभव केला. या विजयाचा आनंद साजरा करत शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने गुढी फडकावली.
  • गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते.

हेही वाचा :

Gudipadwa 2023 : कधी आहे गुढीपाडवा? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पद्धत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -