गुरू पौर्णिमा 2022 : भाग्योदयासाठी करा ‘या’ गोष्टींचे दान

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे

हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की, पृथ्वीवर गुरू ईश्वरासमान असतो. या दिवशी आपल्या गुरूची सेवा करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि शास्त्रात वेदव्यासांना भगवान श्री गणेशाचे गुरू मानले आहे.तसेच व्यास ऋषींनी १८ पुराणांची रचना केली त्यामुळे वेदव्यास ऋषी यांचा जन्मदिवस गुरू पौर्णिमा म्हणूआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहेन साजरा केला जातो. अनेकजण या दिवशी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक उपाय करतात.

भाग्योदय आणि नोकरीत यश प्राप्त करण्यासाठी हे उपाय महत्वाचे :

  • गुरू पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही लक्ष्मी-नारायण मंदिरामध्ये नारळ अर्पण करा, असं म्हणतात की या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
  • जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरूदोष असेल तर गुरू पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंची पूजा-आराधना करा. तसेच गरजू व्यक्तींना दान करा.
  • ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच लक्ष लागत नसेल तर , अशा मुलांनी गुरू पौर्णिमेच्या दिवशी गीतेचा पाठ करा.
  • वैवाहिक आयुष्यात सतत कलह निर्माण होत असतील तर, गुरू पौर्णिमेच्या दिवशी घरात गुरू यंत्राची स्थापना करा आणि त्याची विधिवत पूजा करा.
  • नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी गुरू पौर्णिमेच्या दिवशी पिवळी मिठाई प्रसाद म्हणून दान करा.

गुरू पौर्णिमेला करा गुरूचे पूजन :

  • गुरू पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
  • त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून घ्या.
  • त्यानंतर तुम्ही ज्यांना मनापासून गुरू मानता, अशा देवतेची मूर्ति किंवा फोटो पाटावर मांडा त्यांची विधिवत पूजा करा.
  • तसेच त्यांना कुंकू, चंदन, फूल, फळं आणि प्रसाद अर्पण करा.
  • त्यानंतर गुरुंच्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठण करा.

हेही वाचा :गुरू पौर्णिमेला बनतोय तीन ग्रहांचा अद्भूत संयोग; ‘या’ ३ राशींना होणार फायदा