Friday, April 19, 2024
घरमानिनीReligiousश्रावणात करा मोरपंखाचे 'हे' खास उपाय; मिळेल अद्भूत फळ

श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ

Subscribe

श्रावण महिन्यात मोरपंखांच्या उपायाने अनेक प्रकारच्या समस्यांचे निवारण होऊ शकते. मोरपंखाच्या उपायाने आर्थिक तंगी, नजर दोष, ग्रह दोषापासून मुक्ति यांसारख्या अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.

ज्योतिष शास्त्रात मोरपंखांना अत्यंत शुभ मानलं जातं, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. इतकंच नव्हे तर भगवान श्रीकृष्णसुद्धा त्यांच्या मुकुटावर मोरपंख धारण करायचे. भारताच्या अनेक पुरातन गंथांमध्ये देखील मोराचा विशेष उल्लेख केलेला आहे. मोराला भगवान कार्तिक आणि देवी सरस्वतीचं वाहन मानलं जातं. मोरपंखांना घरात ठेवण्याचे अनेक अगणित फायदे आहेत.तसेच जर श्रावण महिन्यात मोरपंखांच्या उपायाने अनेक प्रकारच्या समस्यांचे निवारण होऊ शकते. मोरपंखाच्या उपायाने आर्थिक तंगी, नजर दोष, ग्रह दोषापासून मुक्ति यांसारख्या अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.

श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय

  • ग्रह दोष दूर करण्यासाठी
    जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह दोष असतील आणि त्यांमुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यात मोरपंखाचा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या हातामध्ये मोरपंख घ्या आणि ज्या ग्रहासंबंधीत दोष तुमच्या कुंडलीत आहेत त्या ग्रहाचा मंत्र 21 वेळा म्हणा आणि या पंखावर पानी शिंपडून पुन्हा देवघरात ठेवून द्या. यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
  • धन प्राप्तीसाठी
    तुम्हाला सतत आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर अशावेळी धनप्राप्तिसाठी तुम्ही 40 दिवस मोरपंख मंदिरात ठेवून त्याची पूजा करा, त्यानंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेऊन द्या.
  • घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी
    घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल तर घराच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) कोपऱ्यात 10-12 मोरपंखांचा एक गुच्छ ठेवा, या उपायाने तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा टिकून राहील. इतकंच नाही तर घरातील भांडणं, कटकटी, वास्तुदोष यांचंसुद्धा निवारण होईल.

हेही वाचा :

मंदिराबाहेरून चप्पल चोरी झाल्यास मानले जाते शुभ

- Advertisment -

Manini