Hindu Shastra : 9 ऑगस्टच्या भौम प्रदोष व्रताची कशी करावी पूजा विधी; जाणून घ्या…

९ ऑगस्ट रोजी श्रावणातील पहिले प्रदोष व्रत असेल. या दिवशी मंगळवार असल्यामुळे या प्रदोष व्रताला भौम प्रदोष या नावाने ओळखले जाते.

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते. तसेच श्रावण महिन्यामध्ये पडणाऱ्या प्रदोष व्रताचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. ९ ऑगस्ट रोजी श्रावणातील पहिले प्रदोष व्रत असेल. या दिवशी मंगळवार असल्यामुळे या प्रदोष व्रताला भौम प्रदोष या नावाने ओळखले जाते. अशावेळी या दिवशी भगवान शंकरांसोबतच, मंगळागौरीचे व्रत आणि भगवान हनुमानांची पूजा केल्याने देखील विशेष फळ प्राप्त होऊ शकते. पौराणिक मान्यतेनुसार, जी व्यक्ति भौम प्रदोषाचे व्रत करते. त्या व्यक्तिला कर्जापासून मुक्ति मिळते. तसेच त्या व्यक्तिचे आरोग्य देखील चांगले राहते.

भौम प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त

 • ९ ऑगस्ट, मंगळवार संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपासून सुरू ते
 • १० ऑगस्ट, बुधवार दुपारी २ वाजून १५ मिनिटांपर्यंत

शुभ मुहूर्त
९ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजून ६ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून १४ मिनिटापर्यंत

भौम प्रदोष पूजा विधी

 • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
 • दिवसभर भगवान शंकरांचे स्मरण करत उपवास करण्याचा संकल्प करा.
 • दिवसभर फक्त फळाहार किंवा दुधाचे सेवन करा.
 • संध्याकाळी स्वच्छ होऊन पांढरे स्वच्छ वस्त्र धारण करा.
 • घरातील पूजा घर स्वच्छ करून भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करा.
 • सर्वप्रथम पिंडीवर जल अर्पण करा.
 • त्यानंतर सफेद फुलं, बेल, धतूरा, चंदन, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा.
 • देवासमोर धूप, दिप प्रज्वलित करा.
 • भगवान शंकरांच्या मंत्रांचा जाप करा.
 • प्रदोष व्रताच्या कथेचे पठन करा.
 • भगवान शंकरांची आरती करा.

हेही वाचा :Hindu Shastra : शनीदेवाची पूजा करताना करा ‘या’ 5 नियमांचे पालन