Hindu Shastra : पहिल्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करा ‘ही’ शिवामूठ; भगवान शंकर होतील प्रसन्न

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, फळ, सफेद फुलं, धतूरा हे अर्पण करतात. मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट भगवान शंकरांना अर्पण केली जाते. ती म्हणजे शिवामूठ

उद्या श्रावणातला पहिला सोमवार हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. तसेच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, फळ, सफेद फुलं, धतूरा हे अर्पण करतात. मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट भगवान शंकरांना अर्पण केली जाते. ती म्हणजे शिवामूठ पौराणिक मान्यतेनुसार, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तांदूळ, तीळ(पांढरे), मूग, जव यांपैकी एक-एक धान्य शिवामूठ म्हणून वापरले जाते.

  • पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून तांदूळ वापरली जाते. असं म्हणतात तांदूळ म्हणजेच अक्षता शिवपिंडीवर अर्पण केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. परंतु शिवपिंडीवर किंवा कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये तुटलेल्या अक्षता वापरू नये. पूजेसाठी नेहमी अखंड अक्षतांचा वापर करावा.
  • शिवपिंडीवर अखंड अक्षता अर्पण केल्यास देवी अन्नपूर्णा देखील प्रसन्न होतात.
  • या उपायाने आपल्या कुटुंबामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरचा भासत नाही.
  • शिवपिंडीवर अक्षता अर्पण करताना करा या मंत्राचे पठण
    अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकमाक्ता: सुशोभिता: मया निवेदिता भक्त्या: गृहाण परमेश्वर॥

हेही वाचा :Hindu Shastra : श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ