Hindu Shastra : कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ महत्त्वाचे उपाय

या वर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन शुभ योग बनणार आहेत. २ ऑगस्ट रोजी नागपंचमी शिव योग आणि सिद्धि योगामध्ये साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत शिव योग राहिल

श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. याचं महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. यावर्षी नागपंचमी २ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, नागपंचमीचा दिवस काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी खास असतो. अनेकांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो. ज्यामुळे त्या व्यक्तिला आयुष्यात अनेक लहान-मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेचं नागपंचमीचा दिवस कालसर्प दोष दूर करण्यासाठी अतिशय लाभ दायक आहे. असं म्हणतात की, या दिवशी काही खास उपाय केल्याने कालसर्प दोष होऊ शकतो.

नागपंचमीच्या दिवशी दोन शुभ संयोग
या वर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन शुभ योग बनणार आहेत. २ ऑगस्ट रोजी नागपंचमी शिव योग आणि सिद्धि योगामध्ये साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत शिव योग राहिल. त्यानंतर सिद्धि योग सुरू होईल. या मुहूर्तांमध्ये भगवान शिव आणि नाग देवता यांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील.

कालसर्प दोष दूर करण्यासाठी करा हे उपाय

  • कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या सापाची लहान मूर्ती घरी आणून त्याची पूजा करा.
  • शक्य असल्यास या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा शक्य असेल त्या भगवान शंकरांच्या तीर्थ क्षेत्रात जावून कालसर्प शांती  केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
  • कालसर्प दोषापासून मुक्ती व्हावी यासाठी तुम्ही कुत्र्यांना दूध-चपाती खाऊ घाला. दररोज या उपाय केल्यास तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल.
  • या दिवशी तुम्ही शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर दूध अर्पण करा.
  • कालसर्प दोष कमी होण्यासाठी ॐ नमः शिवाय या मंत्राचा नियमीत १००८ वेळा जप करा.

हेही वाचा :Hindu Shastra : पहिल्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करा ‘ही’ शिवामूठ; भगवान शंकर होतील प्रसन्न