हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. यंदा 6 मार्च 2023 रोजी होलिका दहन केले जाईल आणि 7 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल.ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी काही उपायांसोबतच काही गोष्टींचे दान करणं देखील शुभ मानलं जातं.
या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी 3 गोष्टींचे दान करणं खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. असं म्हटलं जातं की, या गोष्टींचे दान केल्याने देवी लक्ष्मीचा आशिर्वाद प्राप्त होतो.
होळीच्या दिवशी करा ‘या’ गोष्टींचे दान
वस्त्र दान
ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्र दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे पुण्य प्राप्ती होते. इतकंच नव्हे तर यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होतात.
धन दान
धन दान केल्याने देखील शुभ फल प्राप्ती होते. धन दान तुम्ही मंदिर, ब्राह्मण किंवा गरीबांना करु शकता.
गरीबांना अन्नदान करा
ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी गरीब, गरजू व्यक्तीला अन्नदान करा. या देवी लक्ष्मीसोबतच देवी अन्नपूर्णा देखील प्रसन्न होतील.
हेही वाचा :