Holi 2023 : होळीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ चुका

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात.

होळी तिथी प्रारंभ : 6 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4:17 पासून सुरु ते 7 मार्च 2023 संध्याकाळी 6:09 पर्यंत त्यामुळे 6 मार्च रोजी संध्याकाळी होलिका दहन केले जाईल. तसेच 7 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल.

  • ज्योतिषानुसार, या दिवसात ग्रहांचा स्वभाव उग्र असतो त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी काही कामे करणे गरजेचे आहे
  • होलिका दहनाच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ शकतो.
  • होलिका दहना दिवशी केस मोकळे सोडू नका.
  • होलिका दहनाच्या रात्री कोणाच्याही घरी जेवू नका.
  • या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करुन बसू नका.
  • या दिवशी शिळे अन्न देखील खाऊ नये.
  • होलिका दहनाच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका.
  • या दिवशी सूनसान ठिकाणी जाऊ नका.

होळी सणाचे महत्त्व

हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी-देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. यंदा रंगपंचमी बुधवारी खेळली जाणार आहे.


 हेही वाचा :

Holi 2023 : कधी आहे होळी? जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व