Holi 2023 : पुढचे 8 दिवस होलाष्टकात करू नका ‘या’ गोष्टी

होळीच्या आठ दिवसआधी सुरु होणारे होलाष्टक कालपासून (27 फेब्रुवारी) सुरु झाले आहे. होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरु होते आणि फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या दिवशी संपते. यंदा होलाष्टक (27 फेब्रुवारी) सुरु झाले असून ते 7 मार्चपर्यंत असणार आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. कारण होलाष्टकात सर्व ग्रह खूप उग्र असतात, अशा स्थितीत या काळात केलेले कार्य अशुभ फळ देते. त्यामुळे होळाष्टकात शुभ कर्मे केली जात नाहीत, अन्यथा शुभ कर्मांचे अशुभ फळ मिळते.

होलाष्टकात करु नये ‘ही’ कामे

होलाष्टकच्या 8 दिवसांदरम्यान लग्न, मुंडण, घर , जमीन, वाहने इत्यादी खरेदी-विक्री करण्यास मनाई आहे. या 8 दिवसात कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले आहे.

होलाष्टकात काय करावे?

HOLIKA DAHANA - March 7, 2023 - National Today

होलाष्टक देवी-देवतांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानले जाते. या काळात विशेषतः महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य चांगले राहते. तसेच अकाली मृत्यूची भीती देखील दूर होते.

होळी तिथी प्रारंभ : 6 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4:17 पासून सुरु ते 7 मार्च 2023 संध्याकाळी 6:09 पर्यंत त्यामुळे 7 मार्च रोजी संध्याकाळी होलिका दहन केले जाईल. तसेच 8 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल.

होळी सणाचे महत्त्व

हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी-देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. यंदा रंगपंचमी बुधवारी खेळली जाणार आहे.

 


हेही वाचा :

Holi 2023 : होळीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ चुका