यंदा किती दिवसाची आहे नवरात्र? जाणून घ्या अष्टमी आणि नवमी तिथी

हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

हिंदू धर्मामध्ये नवरीत्रीच्या नऊ दिवसाच्या तिथीनुसार देवीची पूजा केली जाते. तिथी कमी झाल्यास किंवा वाढल्यास अष्टमी आणि नवमी तिथी पुढे-मागे होते. ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीची तिथी कमी होणं अशुभ मानले जाते. या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी महाष्टमी असेल तर महानवमी 4 ऑक्टोबर रोजी असेल. तसेच 5 व्या दिवशी देवीचे विसर्जन केले जाईल.

महानवमीचे महत्व
धार्मिक कथांनुसार, राक्षसांचा राजा महिषासुराविरूद्ध देवीने 9 दिवसांपर्यंत युद्ध केले होते. त्यामुळे या पर्वाला 9 दिवसांपर्यंत साजारा केले जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला देवीने विजय मिळवला होता. त्यामुळे या दिवसाला महानवमी देखील म्हटलं जातं.

शारदीय नवरात्र 2022 तिथि

26 सप्टेंबर – शैलपुत्रीची पूजा
27 सप्टेंबर – ब्रह्मचारिणीची पूजा
28 सप्टेंबर – चंद्रघंटाची पूजा
29 सप्टेंबर – कुष्मांडाची पूजा
30 सप्टेंबर – स्कंदमाताची पूजा
1 ऑक्टोबर – कात्यायनीची पूजा
2 ऑक्टोबर – कालरात्रीची की पूजा
3 ऑक्टोबर – महागौरीची पूजा
4 ऑक्टोबर – सिद्धिदात्रीची पूजा
5 ऑक्टोबर – विजयादशमी

 


हेही वाचा :

या नवरात्रीत देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार; जाणून घ्या महत्त्व