घरभक्तीआजपासून आदिशक्तीचा जागर! घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

आजपासून आदिशक्तीचा जागर! घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Subscribe

नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

कोरोना महामारीच्या संकटानंतर आता दोन वर्षांनी देशभर शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुढील नऊ दिवस आता आदिशक्तीचा जागर होणार आहे. सर्व निर्बंध हटवल्याने गरबा खेळण्यासाठीही तरुणांमध्ये उत्साह दिसून येतोय. नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

- Advertisement -

शारदीय नवरात्री 2022 तिथी
प्रतिपदा तिथी प्रारंभ : 26 सप्टेंबर 2022, सोमवार, पहाटे 3.23 पासून ते
प्रतिपदा तिथी समाप्त : 27 सप्टेंबर 2022, मंगळवार, पहाटे 3.08 पर्यंत

शारदीय नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्त
26 सप्टेंबर 2022, सोमवार हा नवरात्रीचा पहिला दिवस असून
सकाळी 6.28 ते 8.01 पर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे.
घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त
सकाळी 11.54 ते 12.42 पर्यंत असणार आहे.

- Advertisement -

घटस्थापना कशी करावी जाणून घ्या पूजा विधी

  • घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करा त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करा.
  • आता एक मातीचे भांडे घ्या आणि त्यामध्ये माती घेऊन त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य घाला.
  • आता घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला एका चौरगावर लाल वस्त्र अंधरून त्यावर दुर्गा देवीचा फोटो स्थापन करा.
  • आता एका तांब्याच्या कलशावर कुंकवाने स्वास्तिक काढा.
  • कलशामध्ये स्वच्छ पाणी भरा त्यामध्ये दुर्वा, सुपारी, अक्षता, फुलं, गंध, एक रूपायाचा शिक्का टाकून कलशावर लाल धागा बांधा.
  • आता कलशावर पाच आंब्याची पानं ठेवा आणि त्यावर एक नारळ ठेवा.
  • आता देवीच्या फोटोसमोर हा कळश आणि धान्याचे भांडे ठेवा. कलश स्थापन करताना ओम आ जिघ्र कलशं मह्या त्वा विशन्त्विन्दव:। पुनरूर्जा नि वर्तस्व सा नः सहस्रं धुक्ष्वोरुधारा पयस्वती पुनर्मा विशतादयिः।। या मंत्राचा जाप करा.
  • कलश स्थापन झाल्यानंतर देवीसमोर धूप-दीप लावा. त्यानंतर देवीची पूजा सुरू करा.

हेही वाचा :

‘या’ दिवशी सुरू होणार अश्विन नवरात्र; जाणून घ्या शुभ मुहूर्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -