घरभक्तीदेवउठनी एकादशीला 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होणार भगवान विष्णू; जाणून घ्या तुळसी...

देवउठनी एकादशीला 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होणार भगवान विष्णू; जाणून घ्या तुळसी विवाहाचे महत्त्व

Subscribe

या वर्षी देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू जवळपास 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होणार आहेत.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हटलं जातं. या वर्षी देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू जवळपास 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होणार आहेत. तसेच मागील चार महिने जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरु होतील. सोबतच देवउठनी एकादशी पासून लग्नसोहळ्या सारखे मांगलिक कार्य देखील सुरु होतील.

देवउठनी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त
देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे.
देवउठनी एकादशीची सुरुवात – 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6:08 पासून
देवउठनी एकादशी समाप्ती – 5 नोव्हेंबर संध्याकाळी 5:06 पर्यंत असेल त्यानंतर द्वादशी तिथी चालू होईल.

- Advertisement -

देवउठनी एकादशीला करा तुलसी विवाह
चार महिन्यानंतर जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा शालीग्राम/कृष्ण आणि तुळशीचा विवाह केला जातो. त्यानंतरच इतर लग्नांचे मुहूर्ताची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार, चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टिचे कार्य हाती घेतात. भगवान विष्णूंचा विश्रांती काळ आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून सुरु होतो जो कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीपर्यंत असतो.

देवउठनी एकादशीची अशा प्रकारे करा पूजा

- Advertisement -
  • देवउठनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
    भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.
  • तसेच द्वादशी तिथीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह करावा.

देवउठनी एकादशीला करु नका ‘या’ चूका
एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते. अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.

  • भात खाऊ नका
    शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की, जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते. त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आर्शिवाद मिळत नाही. एकादशीच्या भात खाणं पाप मानले जाते.
  • मीठाचे सेवन करू नका
    शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये, अधवा कमी प्रमाणात खावे.
  • मांसाहार करू नका
    शास्त्रानुसार, एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा.
  • या गोष्टींचे सेवन करू नका
    एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मूळा, कांदा , लसूण यांचे सेवन करणे टाळावे.

हेही वाचा :  तुळशी विवाहाचा काय आहे शुभ मुहूर्त? जाणून घ्या पूजाविधी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -